Tuesday, March 21, 2023
Homeक्राइमनासिक रोड करंसी नोट प्रेस च्या पार्किंग मध्ये बॉम्ब, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

नासिक रोड करंसी नोट प्रेस च्या पार्किंग मध्ये बॉम्ब, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

96 Views

नासिक रोड करंसी नोट प्रेस च्या पार्किंग मध्ये बॉम्ब….. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण……

भारतावर अतिरेक्यांचा नेहमीच डोळा असतो नेहमीच काहीतरी दुर्घटना घडवून आणण्याच्या प्रयत्नात असतात. त्यातच नासिक रोड मध्ये CNP नोट प्रेस, भारत प्रतिभुती मुद्रणालय, मध्यवर्ती कारागृह सारख्या अनेक महत्त्वाचे ठिकाण असल्याने कधी काय होईल सांगता येत नाही. महत्त्वाच्या ठिकाणी संरक्षण असतेच पण अचानक नासिक रोड येथील करेन्सी नोट प्रेसच्या आज सायंकाळी 6 वाजता बॉम्ब मिळून आल्याने एकच धावपळ झाली. जेल रोड येथील प्रेस च्या मागच्या बाजूला असलेल्या दोन नंबर गेटजवळ जुनी सायकल स्टँड पार्किंग आहे तिथे सदरचा बॉम्ब मिळून आला. लगेचच CISF च्या पथकाला कळविण्यात आले. पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेत बॉम्ब असल्याची खात्री झाल्यानंतर त्वरित नासिक पोलिसांना आणि बॉम्ब शोधक आणि नाश पथकाला बॉम्ब असल्याची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिकचे सहायक पोलिस उपायुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ, उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज भालेराव आपल्या टीम सोबत दाखल झाले. वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन रस्त्याचा ताबा घेतला. घटनास्थळ येथून नागरिकांना बाजूला करण्यात आले. नेहरू नगर जाणारा गेट सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला. CISF चे अग्निशमन दला आणि ॲम्बुलन्स सायरन वाजवीत आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली कधी असे घडले नाही म्हणून नागरिक काय झाले म्हणून गेट जवळ पोहोचले. बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी सर्व प्रथम श्वान पथकाला पाचारण केले. तोपर्यंत पथकातील बॉम्ब निकामी करणारे अधिकारी बॉम्ब असल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बॉम्ब निकामी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

परिसरात बघ्यांची गर्दी वाढत गेली. बॉम्ब शोधक पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतर बॉम्ब निकामी केले. नागरिकांमध्ये उत्सुकता होती की बॉम्ब कसे आले, काय झाले, बॉम्ब निकामी करण्यात आला का असे अनेक प्रश्न मनात येत होते पण शेवटी CISF आणि पोलिसांनी सदर बॉम्ब निकामी करण्यात आल्याचे घोषित केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला पण हा मोकड्रिल्ल असल्याचेही घोषित केले. आज घेण्यात आलेल्या मोकड्रिल मध्ये CISF च्या डीप्टी कमांडंट कार्तिका नेगी, सहायक कमांडंट मुकेश चतुर्वेदी, CNP चे मुख्य महा प्रबंधक बोलेवर बाबू, आय वी अधिकारी हर्जन सिंग, दक्षता प्रभारी उप निरीक्षक बालवीर सिंह, नाशिकचे सहायक पोलिस उपायुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ, उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज भालेराव, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर कदम प्रकाश आरोटे,अनिल पवार,सुधीर काकड, विजय गवते.बॉम्ब शोधक आणि नाश पथकाचे पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड, नंदू उगाले, भूषण खैरनार, घनश्याम पाटील, अनिल केदारे, फिरोज मुलाणी, रोहित धटिंगण, श्वान लकी तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments