अखिल विश्व वारकरी परिषदेतर्फे सुषमा अंधारे यांचा जाहीर निषेध, सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करा जिल्हाअधिकारी यांना निवेदन
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देव देवता वसंत महात्म्यांबद्दल केलेल्या वाचाळ वक्तव्याचा अखिल विश्व वारकरी परिषदेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. प्रसंगी वारकरी समुदायातली कीर्तनकार टाळकरी वारकरी महाराज महिला कीर्तनकार बहुसंख्येने उपस्थित होते. नाशिकचे जिल्हाधिकारी डी गंगाधरण यांना निवेदन देऊन सुषमा अंधारे यांना तत्काळ अटक करावी व त्यांच्या वरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी वारकऱ्यांमार्फत करण्यात आली. टाळ मृदुंगाचा गजर करीत सुषमा अंधारे यांच्यावर वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अशाप्रकारे पुढील काळात जर देवदेवता वारकरी संत महात्मे यांच्या बद्दल वाचाळ वाक्य केले तर आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्रभर आंदोलन पेटवू असा इशारा वारकऱ्यांनी दिला आहे
यावेळी सोपान महाराज गायकवाड अनिल महाराज सातपुते हरिभक्त पारायण अनिल महाराज सातपुते ह भ प अक्षय महाराज इंगळे उपस्थित होते