ॲड. प्रेमनाथ पवार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कायदे विषयक , मानव अधिकार आणि माहिती अधिकार सेलच्या महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी पदी व नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती
नाशिक रोड (प्रतिनिधी) – नाशिक जिल्हा न्यायालयात गेल्या ३० वर्षा पासून वकिली व्यवसाय करणारे आणि नाशिक डिस्ट्रिक्ट ॲडव्होकेट मल्टि परपज कॉ. ऑप. सो. लीमिटेड नाशिक जिल्हा ह्या संस्थेचे विद्यमान संचालक ॲड.प्रेमनाथ के. पवार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने लीगल सेल , ह्यूमन राईट्स सेल व आर.टी.आय डिपार्टमेंट ह्या सेल च्या महाराष्ट्र राज्याच्या जनरल सेक्रेटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली त्यातबाबतचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे लीगल सेलचे प्रदेश अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील ॲडव्होकेट रवि प्रकाश जाधव यांनी नियुक्तीचे पत्र ॲड.प्रेमनाथ पवार यांना दिले ते
अनेक संस्था व अनेक सामाजिक संघटनावर कार्यरत असून सामाजिक कामात अग्रेसर असलेले ॲड.प्रेमनाथ पवार यांचे वकिली व्यवसायातील योगदान तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य विचारात घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कायदे विषयक , मानव अधिकार आणि माहिती अधिकार सेलच्या महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी पदी व नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे अनेक स्तरावर अनेक जणi कडून हार्दिक अभिनंदन केले जात आहे.