अमरावती येथून खून करून पसार झालेल्या आरोपीस नाशिकरोड पोलिसांनी केली अटक….
अमरावती येथील फैजलपुरा पोलिस ठाणे हद्दीतून खून करून पसार सुरन सुभाष मारये यास नासिक रोड पोलिसांनी अटक केली आहे. टवाळखोरांचा शोध घेण्याच्या अनुषंगाने नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यानी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांना तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन करून शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. नाशिकरोड पोलीस ठाणेच्या हद्दीत छोटे मोठे गुंड, टवाळखोर व फरारी आरोपींचा नाशिकरोड पोलीस ठाणेमधील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना नाशिकरोड पोलीस ठाणेच्या हद्दीत सिन्नर फाटा, रेल्वे स्टेशन भागात माहिती घेवुन शोध घेत असताना सिन्नर फाटा भागात एक सायंशित मिळून आला त्यास अधिक चौकशीकरिता नाशिकरोड पोलीस ठाणेत आणून अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. नासिक रोड पोलिसांनी फैजलपुरा पोलीस ठाणेशी संपर्क साधुन त्यांना नमुद गुन्हयातील फरार मुख्य आरोपी अटक केल्याबाबतची माहिती दिली असुन पुढील तपासकामी आरोपीस अमरावती पोलीसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. सदरची उल्लेखनिय कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गद्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे तसेच पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ कार्यालयातील पोलिस नाईक विशाल पाटील व नाशिकरोड पोलीस ठाणेमधील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, वसंत काकड,अविनाश देवरे,मनोहर शिंदे,सोमनाथ जाधव,राकेश बोडके, केतन कोकाटे यांनी यशस्वरित्या पार पाडली.