Homeहेल्थनाशिकरोडला अनधिकृत सोनोग्राफी मशीन मनपाकडून सील
नाशिकरोडला अनधिकृत सोनोग्राफी मशीन मनपाकडून सील
462 Views
नाशिकरोडला अनधिकृत सोनोग्राफी मशीन मनपाकडून सील…..
नासिक रोड देवळाली गाव येथील महसोबा मंदिर समोर असलेल्या श्री बालाजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अनधिकृत सोनोग्राफी मशीन आढलून आल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. नासिक पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी मिळत होत्या.

आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघडकीस आला. डॉ राजेंद्र भंडारी आणि डॉ सुनीता भंडारी यांच्या मालकीचे हे हॉस्पिटल असल्याचे या हॉस्पिटल मध्ये असलेल्या फलकावरून निष्पन्न झाले. त्यानुसार ही कारवाई झाल्याचे पालिका आरोग्य अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे यानी यावेळी दिली. नासिक मनपाकडून झालेल्या या कारवाईत हॉस्पिटल मधील सोनोग्राफी मशीन सिल करण्यात आले असून अनधिकृत सोनोग्राफी मशीन मधून कुठल्या प्रकारचे अहवाल घेतले जात होते ते पुढील कारवाई चौकशी अंती केली जाईल अशी माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली