हल्ल्यात जखमी तरुणाचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू.
काही दिवसांपूर्वी समीर पठाण या युवकावर सौभाग्य नगर येथे तेरा दिवसांपूर्वी जुन्या वादातून धारदार कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. तेरा दिवसांच्या उपचारादरम्यान आज पहाटे समीर पठाण याचा आज दुर्देवी मृत्यू झाला.
समीर ऊर्फ मुस्तफा सलीम खान पठाण रा. विहितगाव, नाशिकरोड त्याच्या ताब्यातील दुचाकी गाडी क्र. एमएच १५ एफके ६४४६ ही पेट्रोल भरण्यासाठी घेऊन जात होता. गाडी मोनू वर्मा चालवत होता. आम्ही रस्त्याने जात असताना सौभाग्यनगर- लॅम रोडवरील लक्ष्मी फार्मा मेडिकलसमोर नाशिकरोड बाजूकडून आलेल्या पिवळ्या रंगाच्या कारने मागून धडक दिली.
त्यावेळी संशयित बाळा जाधव, दिनेश जाधव व इतर दोन जणांनी समीरबरोबर जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करीत हातातील कोयत्याने समीरच्या डोके व छातीवर वार केले. मोनू वर्मा हे भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही मारहाण केली. याबाबत मोनू संजय वर्मा रा, देवळाली गाव, नाशिकरोड याने 4 डिसेंबर रोजी तशी फिर्याद दिली होती. समीरच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव झाल्याने मोनू याने आरडओरडा केला. त्यावेळी हल्लेखोर देवळाली कॅम्पच्या दिशेने पळून गेले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने समीरला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. समीरच्या डोक्यावर, हाताच्या बोटावर महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया करण्यात आल्या मात्र आज पहाटे समिरचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. मृत्यूची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्याहादे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक गोसावी व गुन्हे शोध पथकाने हॉस्पिटल मध्ये धाव घेतली. मृत्यूची माहिती नाशिकरोड परिसरात पसरताच तणावाचे वातावरण निर्माण झाले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी घराजवळ बंदोबस्त तैनात केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित बाळा जाधव व दिनेश जाधव यांना ताब्यात घेतले आहे. नाशिक रोड पोलीस करत आहे समिर पठाण याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.