137 Views
नाशिकरोड प्रतिनिधी:-सिन्नरच्या मोहदरी घाटात भयानक अपघात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. सिन्नर तालुक्यातील मोहदरी घाटात तीन कारमध्ये हा अपघात झाला असून त्यात ५ विद्यार्थि जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

कारचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला.पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ हा अपघात झाला आहे.
संगमेनरकडून नाशिककडे स्विफ्ट डिझायर कार येत होती. मात्र, या कारचा टायर अचानक फुटलं. त्यावेळी कार भरधाव वेगात होती.त्यामुळेच ही कार अनियंत्रित झाली. परिणामी, डिव्हायडर तोडून ही कार थेट पलिकडच्या रस्त्यावर गेली. यावेळी कारने समोरुन येणाऱ्या दोन वाहनांना जोरदार धडक दिली.