डॉ,बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मनुवाद्यांच्या जीवावी लागला,असा आरोप आंबेडकर अनुयायी यांनी केलं

0
63
63 Views

डॉ,बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा मनुवाद्यांच्या जीवावी लागला,असा आरोप आंबेडकर अनुयायी यांनी केलं

सरकारच्या जागेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवाल तर तुम्ही गुन्हेगार आहात असे स्पष्ट मत पोलिसांचा आहे मग अनाधिकृत ठिकाणी १०० देवालय उभारले आहेत ती अनाधिकृत नाहीत का ? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला म्हणून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करतात मग देवालय उभारणार्यांवर पोलीस गुन्हा दाखल का करीत नाही असा परखड सवाल आंबेडकर अनुयायी यांनी केला.

नाशिक रोड येथील भालेराव मळ्यात काही उत्साही आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धकृती पुतळा भालेराव मळा वसाहतीत जवळ बसवला आणि वाधग पेटलं.सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होता या निमित्ताने भालेराव मळा येथील काही कार्यकर्त्यांनी श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेतला आणि सदरील वसाहतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा बसवला. मात्र हा पुतळा काही मनुवाद्यांच्या जीवावी लागला आणि संजय अशोक भालेराव व त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर पोलिसांनी ४४७,१८८,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवणार काही गैर नाही हे संविधानाला घटनेला धरून आहे मात्र काही मनुवाद्यांच्या पोटात पोटदुखी सुरू झाली आणि बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी नको असा त्यांनी पोलिसांकडे आग्रह धरला. शासकीय कार्यालय पोलीस स्टेशन आणि काही इतर शासनाच्या मिळकतींवर खुलेआम देवालय सजली आहेत मंदिर बांधले आहेत. ते अधिकृत आहेत का असा खडा सवाल दलित महा विकास चे कैलास तेलोरे यांनी शासनाला जाब विचारला आहे की सदरील देवालय हे अधिकृत आहेत का जर ते अधिकृत असतील तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अतिकृत ठिकाणी बसवतो अन्यथा अनधिकृत ठिकाणी बसवणे हे काही गैर नाही भले आंबेडकरी अनुयांवर गुन्हे दाखल झाले तरी चालतील. काही नत भ्रष्ट मनुवाद्यांकडून जर समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर शासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करावे असे खडसावून सांगितले आहे.


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा बसवण्यात आला असून त्याला शासनाच्या चौकटीत कसे बसवायचे हे आवाहन आंबेडकर अनुयायान समोर आहे. या संदर्भातील पाठपुरावा दलित विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलास तेलोरे माजी नगरसेविका सरस्वती भालेराव कानुबाई सुकेनकर मंदा वाघ सरूबाई गंगावणे कल्पना लोखंडे कल्पना सोनवणे सारिका घोडेराव शोभा बागुल संगीता भालेराव धनश्री भोर स्वाती गंगावणे माधुरी सोनवणे विजय भालेराव बिपिन मोहिते प्रशांत भालेराव महेश सुकेनकर सुनील पठारे बाळू सावंत आदि आंबेडकर अन्यायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्याच ठिकाणी राहावा यासाठी लढा देत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here