Saturday, February 4, 2023
Homeअपघातनाशिकपुणे महामार्गावर पळसे येथे दोन बसचा विचित्र अपघात,बस जळून खाक

नाशिकपुणे महामार्गावर पळसे येथे दोन बसचा विचित्र अपघात,बस जळून खाक

58 Views

नाशिकपुणे महामार्गावर पळसे येथे दोन बसचा विचित्र अपघात, बस जळून खाक

नाशिकरोड राजगुरूनगरहून नाशिककडे येणाऱ्या बसने पुढे उभ्या असलेल्या बसला धडक दिल्याने झालेल्या या अपघातात बस पेटल्याने दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना पळसे येथे घडली. या धडकेत राजगुरूनगरहून येणारी बस जळून पूर्ण खाक झाली असून, , बसमधील प्रवासी सुखरूप आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, की राजगुरूनगर डेपो येथून नाशिककडे एमएच ०७ सी ७०८१ या क्रमांकाची बस येत होती. ही बस पळसेजवळ आली असताना त्या बसच्या पुढेच एमएच १४ बीटी ३६३५ या क्रमांकाची सिन्नर डेपोची बस उभी होती. त्या बसमधून प्रवासी उतरत असताना राजगुरूनगरच्या बसने समोर असलेल्या दोन दुचाकीस्वारांना जोरात धडक दिल्याने ते दोघे या दोन बसमध्ये दाबले गेले. समोरील बसला धडक दिल्यानंतर क्षणात राजगुरूनगरच्या बसने पेट घेतला. घटना घडल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत बसमधील प्रवाशांना बसच्या काचा फोडून सुखरूप बाहेर काढले; मात्र दुचाकीवरील दोघांचा या अपघातात नाहक बळी गेला. ही आग अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी विझविली.

पळसे येथील दिलीप गायधनी, दिनेश गोवर्धने, दिनेश एखंडे, संदीप एखंडे, अंकुश गायधनी आदींनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. त्यात संदीप एखंडे यांच्या हातात काच गेल्याने ते जखमी झाले आहेत. यावेळी बघ्यांनी गर्दी केल्याने वाहतूक विस्कळित झाली. घटनास्थळी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, राजू पाचोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील व पोलीस उपनिरीक्षक गोसावी हे दाखल झाले असून, गर्दी पांगविण्याचे काम सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments