अट्टल घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपीला मुंबई नाका पोलिसांनी केली अटक
संशयित आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज हाती लागतच मुंबई नाका पोलिसांना एका गोपनीय बातमीदाराच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी रिजवान मंगल शहा याचा शोध सुरू केला. रिजवान शहा वय वर्ष २३ राहणार कृषी नगर बबलू कुरेशीच्या घरासमोर वडाळा नका नाशिक याच पत्त्यावर राहत असलेला रिजवान मंगल शहा हा अट्टल घरफोडी करणारा आहे.त्याने तब्बल मुंबई नाका हद्दीत चार घरफोड्या केल्या, याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली. रिझवाननी मुंबई नाका पोलीस हद्दीत चार घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून 13 तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे.पोलीस आयुक्त जयवंत नाईक नवरे पोलीस उपआयुक्त किरण चव्हाण, पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत अहिरे ,केटी रौंदळ,सोमनाथ गेगझे ,व्ही आर,सोनार,समीर शेख, आप्पा पनवळ,विश्वास साळुंखे, राजेंद्र नाकोडे यांनी उत्म कामगिरी पार पाडली रिजवान शाहला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे अशी माहिती मुंबई नाका पोलिसांनी दिली.
अट्टल घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपीला मुंबई नाका पोलिसांनी केली अटक
अट्टल घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपीला मुंबई नाका पोलिसांनी केली अटक
61 Views