Home ताज्या बातम्या मध्य रेल्वे दरम्यान गर्दी टाळण्यासाठी प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी...

मध्य रेल्वे दरम्यान गर्दी टाळण्यासाठी प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी करणार……

0

मध्य रेल्वे दरम्यान गर्दी टाळण्यासाठी प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी करणार……

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २ डिसेंबर ते ९ डिसेंबर पर्यंत निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालणार आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश असणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.

मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण, भुसावळ विभागातील बडनेरा, अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक
नागपूर विभागातील नागपूर आणि वर्धा
पुणे विभागातील पुणे
सोलापूर विभाग सोलापूर या रेल्वे स्थानकातील स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी असणार आहे. दरम्यान सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवण्यासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version