Thursday, June 1, 2023
Homeशेतीपाथर्डी येथे वाडीचे राम परिसरात बिबट्या बछडे आणि मादीचे पुनर्मिलन….. वनविभागाचे कौतुक

पाथर्डी येथे वाडीचे राम परिसरात बिबट्या बछडे आणि मादीचे पुनर्मिलन….. वनविभागाचे कौतुक

पाथर्डी येथे वाडीचे राम परिसरात बिबट्या बछडे आणि मादीचे पुनर्मिलन..... वनविभागाचे कौतुक

151 Views

पाथर्डी येथे वाडीचे राम परिसरात बिबट्या बछडे आणि मादीचे पुनर्मिलन….. वनविभागाचे कौतुक
पाथर्डी गावातील वाडीचे राम परिसरात कैलास त्रिंबक ढेमसे यांच्या ढेमसे मळ्यात मजूर उसताेड करीत असताना त्याचवेळी मजूरांना 10 ते 12 दिवसांपूर्वी जन्मलेली बिबट्याची तीन बछडे आढळून आले, त्यावेळी बिबट मादी उसाच्या क्षेत्रातून भक्षाच्या शाेधात गेली. मजुरांनी तात्काळ हि गोष्ट ढेमसे यांनी सांगितली. त्यवरीत सदर माहिती वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर विभागाचे रेस्क्यू पथक ढेमसे मळ्यात दाखल झाले. पथकाने हे बछडे ताब्यात घेत सुरक्षित करून तत्काळ उपाययाेजना करत मादी व बछड्यांचे पुर्नमिलन हाेण्यासाठी व्यवस्था उभारली. रेस्क्यू टीमने सर्व पिल्लांची वैद्यकीय तपासणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री केली. हे बछडे नुकतेच जन्मले असल्याने व त्यांना अन्य लाेकांचे हात लागण्याची दाट शक्यता असल्याने त्यांचे मादीकडे मिलन हाेण्यासाठी उपाययोजना करण्यात आली. पश्चिम भागाचे उपवनसंरक्षक पंकजकुमार गर्ग यांच्या मार्गर्शनाखाली त्याच परिसरात बछड्यांना मयक्रोचीप लावून एका कॅरेट मध्ये बछड्यांना ठेवून त्यांच्यावर सुमारे पाचशे मित्र अंतरावरून कॅमेऱ्याने पाळत ठेवण्यात आली. पथकाचे निरीक्षण सुरू असताना सायंकाळचया सुमारास उशिरा बिबट मादी आली आणि तिने सुरक्षितरित्या बछड्याना नैसर्गिक अधिवासात घेऊन नेले. सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आणि वनविभागाचे कौतुक केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments