राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या हद्दीतील अक्राळे फाटा, इंडियन ऑईलचे पंपासमोर, बनारवाडी शिवार, ता. दिंडोरी येथे सापळा रचून आयशर कंपनीचे मालवाहतुक करणारे वाहन क्र. एम.एच.४८ ए. वाय. ३६६३ पकडून २० लाख ७० हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभाग कळवण यांना मिळालेल्या माहिती नुसार एक आयशर कम्पनीचे वाहन नाशिक दिंडोरी रोडवरून जाणार होते. त्यांनी सापळा रचून अक्राळे फाटा, इंडियन ऑईलचे पंपासमोर, बनारवाडी शिवार, ता. दिंडोरी येथे वाहन पकडले या संशयित वाहनाची तपासणी केली असता सदर वाहन पुर्णतः रिकामे दिसुन आले. परंतु सदर वाहनाच्या केबिनच्या मागच्या बाजुस व वाहनाच्या खालच्या बाजूस संशय येणार नाही अशा ठिकाणी एक विशिष्ट पध्दतीचा कप्पा बनविण्यात आला होता.
सदर कप्यामध्ये गोवा राज्यातील (महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला) मद्यसाठा वाहतुक करतांना आढळून आले. यात परराज्यातील विदेशी मद्य १३६९.२० ब.लि. (एकुण १५३ बॉक्स) गोवा राज्यात विक्रीकरीता विविध ब्रॅन्डच्या विदेशी मद्याचे १४३ बॉक्स, किंगफिशर स्ट्रॉम बिअर मद्याचे १० बॉक्स व सहा चाकी आयशर कंपनीचे एम.एच.४८ ए. बाय ३६६३ वाहन असा रु.२० लाख ७०,हजार ७२०/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कळवणला 21 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त
149 Views