जिल्ह्यातील अनुसूचित व बिगर अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या १५ पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण मंगळवार (दि.५) रोजी सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आले. त्यामुळे नागरिकांसह इच्छुकांच्या नजरा निवडणुकीच्या तारखेकडे लागले आहे.
आज सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणानुसार,कळवण आणि सुरगाणा पंचायत समित्यांचे सभापतीपद अनुसूचित जमाती तर पेठ व त्र्यंबकेश्वरचे अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी निघाले आहे. त्याचबरोबर दिंडोरी पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे.
तर अनुसूचित क्षेत्राबाहेरील पंचायत समित्यांमध्ये इगतपुरी पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी तर चांदवडचे अनुसूचित जमातीसाठी निघाले आहे. याशिवाय नाशिक आणि देवळा पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती (महिला) तर बागलाणचे नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) निश्चित झाले आहे.
१५ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण जाहीर
77 Views
RELATED ARTICLES