Tuesday, March 21, 2023
Homeक्राइमटोळक्याकडून कोयत्याचा धाक महिलेचा विनयभंग

टोळक्याकडून कोयत्याचा धाक महिलेचा विनयभंग

74 Views

टोळक्याकडून कोयत्याचा धाक महिलेचा विनयभंग

नाशिकरोड गेल्या काही दिवसापासून नाशिक रोड व उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयतेधारी टोळीची दहशत सुरूच असून ही दहशत अद्यापही थांबलेली नाही उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या इच्छामणी जॉगिंग ट्रॅक समोरील रस्त्यावर एका कोयतेधारी टोळक्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करून नातेवाईकांना मारहाण केली यावेळी टोळक्याने कोयता काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला . दरम्यान या घटने प्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार या टोळक्याविरुद्ध उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात उपनगर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दाखल केली असून त्यात म्हटले आहे की नातेवाईका समवेत उपनगर येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात असताना यातील संशयित आरोपी राकेश कागडा सचिन कागडा विनय सौदे तिघे राहणार महाराष्ट्र हायस्कूल जवळा उपनगर नाशिक रोड हे त्यांची एक्टिवा गाडी क्रमांक एम एच 21 43 या गाडीवर आले व त्यांनी माझ्या मुलीकडे बघून अश्लील हावभाव केले व विनयभंग केला त्याचप्रमाणे अश्लील भाषेत शिव्या दिल्या व धक्काबुकी केली त्यानंतर नातेवाईकांना मारहाण करून गाडीतून कोयता काढण्याचा प्रयत्न केला व दहशत निर्माण केली असेही तक्रारीत म्हटले आहे दरम्यान या तक्रारीनुसार उपनगर पोलिसांनी या तीन जनाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments