एकलाहरे खून प्रकरणातील २ आरोपी जेरबंद….. गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई……
*एकलहरे रोडवरील खुनाचा गुन्हा मधील अज्ञात आरोपी २ आरोपींना गुन्हे शाखा युनिट १ ने निष्पन्न करून 02 आरोपी जेरबंद करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. रविवारी याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात कलम 302 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होता. खून झालेल्या तरुणाची ओळख नव्हती, पोलिसांनी गुन्हा मधील अज्ञात इसमाचा ओळख पटवणे हे महत्त्वाचे काम होते. अज्ञात इसमाचे ओळख पटवून मयत हा चेतन आनंदा ठमके असल्याबाबत सायंकाळी निष्पन्न झाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी व अमलदार समांतर तपास करीत होते.
युनिट १चे पोलीस अधिकारी व अमलदार आरोपितांचा गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस आमदार आप्पा पानवळ व मुक्तार शेख यांना गुन्ह्यातील आरोपी चेतन आहेर व आशिष भारद्वाज हे एका पांढऱ्या रंगाच्या एक्टिवा गाडीवर सातपूर परिसरामध्ये येणार आहे अशी माहिती मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक तोडकर, साबरे, ठाकरे, परदेशी, शेख, पानवळ,चारुस्कर, जगताप* आदींनी मिळालेल्या बातमीच्या आधारे श्रमिक नगर,सातपूर येथून पंकज विनोद आहेर वय 25 वर्षे रा. शिवकृपा स्वीट च्या समोर,bमहाकाली चौक,bत्रिमूर्ती नगर, सिडको, अंबड, नाशिक व आशिष रामचंद्र भारद्वाज वय 23 वर्षे दोन्ही रा. शुभम पार्क,अंबड नाशिक* यांना ताब्यात घेऊन चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून गुन्हामध्ये वापरलेली एक्टिवा गाडी व गुन्हातील हत्यार लोखंडी कोयता असा एकूण 50,500/- रू किमतीचा मुद्देमाल* हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही आरोपिंना पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.