Home क्राईम घरफोड्या करणारा आरोपी जेरबंद…… भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी

घरफोड्या करणारा आरोपी जेरबंद…… भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी

0

घरफोड्या करणारा आरोपी जेरबंद…… भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी……

१३ फेब्रुवारी रोजी भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा भादंवि कलम ४५४, ३८० प्रमाणे या गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे अविनाश जुंद्रे, नितीन भामरे व दयानंद सोनवणे यांनी गुन्हयाच्या घटनास्थळी येण्या-जाण्याचे मार्गावर तांत्रिक पध्दतीने तपास करून पाहीजे आरोपीबाबत माहीती प्राप्त करून पाहीजे आरोपीच्या प्राप्त केलेल्या माहीतीनुसार सतिष साळुंके व कय्युम सैय्यद यांनी संशयित आरोपी इम्रान हानीफ पठाण, वय २८ वर्षे, रा. नॅशनल स्वीटच्या मागे, साईनाथ नगर, भारतनगर, वडाळा, नाशिक यास वडाळा गाव येथुन ताब्यात घेवुन चौकशीत त्याने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सदर गुन्हया व्यतिरीक्त त्याने भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत मागील एक महिन्यापुर्वी रविंद्र विद्या प्रसारक मंडळ, द्वारका, नाशिक या कॉलेजमधील कार्यालयाच्या बंद दाराचे कुलूप तोडुन घरफोडीचा गुन्हा केला असल्याचे देखील कबूल केले आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलिस उप निरीक्षक यशवंत गांगुर्डे हे करीत आहेत. आरोपीकडुन नमुद गुन्हयासह भद्रकाली पोलीस ठाण्यातील घरफोडीत एकूण 23 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिध्देश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक संतोष नरूटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, सहायक पोलिस उप निरीक्षक यशवंत गांगुर्डे, सतिष साळुंके, कय्युम सैय्यद, अविनाश जुंद्रे, नितीन भामरे, निलेश विखे, दयानंद सोनवणे, नारायण गवळी आदींनी पार पाडली आहे.

नाशिक शहरात मालमत्ते संबंधी घडणाऱ्या गुन्हयांना प्रतिबंध करणेकामी आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालणेबाबत व मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी मार्गदर्शक सुचना व आदेश दिले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version