नाशिकरोड शिवजन्मोत्सव निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न…..
सकल महाराष्ट्राला हेवा वाटावा अशा नाशिकरोड शिवजन्मोत्सव सन २०२४मोठ्या उत्साहात साजरा होणार असून शिवजयंती शांततेत साजरी व्हावी याकरिता नासिक रोड, उपनगर पोलिस ठाण्याची संयुक्त बैठक नासिक रोड पोलिस ठाण्यात संपन्न झाली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, नासिक रोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती शांतता समितीची बैठक संपन्न झाली. शिवजयंती साजरी करताना महानगर पालिकेला, वाहतूक विभाग, जयंती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले विचार तसेच होणाऱ्या अडी अडचणी मांडून त्या कशा दूर करता येतील त्याबद्दल आपले मत मांडले. मनपा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस विभागामार्फत कड्क बंदोबस्त, योग्य नियोजन करण्यात येणार असल्याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी नासिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे,
पोलिस निरीक्षक पवन चौधरी, मनपा नासिक रोड विभागीय कार्यालय विभागीय अधिकारी जवाहरलाल टिळे शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड अध्यक्ष शिवाजी हांडोरे,जेलरोडचे धनंजय लोखंडे कार्याध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, उपाध्यक्ष सुनील पाटोळे, उपाध्यक्ष मंगेश पगार, सरचिटणीस संदिप वाळके, चिटणीस जयेश अरिंगळे, खजिनदार नितीन पाटील यांच्या, जगदीश पवार, नितीन खर्जुल,, योगेश गाडेकर,शांताराम घंटे, बापू सापुते, संतोष क्षिरसागर राजेश फोकणे, आदींसह सर्व पक्षांचे मान्यवर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर, शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, सभासद, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.