वामनदादा कर्डक स्मारकाला येणार मूर्त स्वरूप…. आमदार राहुल ढिकले यांची समरकास भेट…..
अनेक वर्षांपासून रखडलेल्या वामनदादा कर्डक स्मारकाचे रूप पालटणार असून आमदार राहुल ढिकले यांनी जेल रोड येथील लोककवी वामनदादा कर्डक स्मारकाला भेट देऊन राहिलेले उर्वरित काम आपण लवकरच पूर्ण करून पुरोगामी साहित्यिकांसह विचारवंतांचे मत घेऊन स्मारकाला सुंदर चेहरा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. वामनदादांचे स्मारक भव्य आणि दिव्य आहे. मात्र त्यामध्ये अधिक सुंदरता येण्याच्या दृष्टीने कामे बाकी आहे. मुख्यमंत्री निधी अथवा आमदार निधीतून ही कामे लवकरच पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
या ठिकाणी अनेक वर्षापासून स्मारकाचे रखडलेले काम व मोडकळीस झालेल्या स्मारकाला उतरती कळा पाहून या आमदार ढिकले यांनी या स्मारकाच्या ठिकाणी भेट दिली तसेच स्मारकातील तेथील असलेल्या कामाची माहिती घेतली.
नाशिक रोड वामनदादा कर्डक स्मारकाची पाहणी करताना आमदार राहुल ढिकले, शशिकांत उन्हवणे, गणेश उन्हवणे, ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळुंजकर व कलावंतांसह या वेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे, ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळुंजकर, शशिकांत उन्हवने, झोपडपट्टी महासंघाचे हरिभाऊ जाधव, भय्या बाहेती, नितीन पगारे, प्रदीप विर, गिरीश जगताप, सुखदेव वार्डे, रामा शिंदे, सुधीर पगारे, जावेद शेख, बिलाल शेख, मोबिन खान, अबिद शेख, शाहरुख खान, शदाब शेख, रवी पगारे, शिरीष गांगुर्डे, दर्शन पगारे, शरद सोनवणे, प्रशांत पाटील, गोविंद शिनगारे, नवनाथ माने, मुरली कोळे, मनोज अहिरे, सुनीता कर्डक, मुक्ता खर्जुल, अलका निकम, लक्ष्मी गडगडे, निर्मला सोनवणे, गयाबाई काळे उपस्थित होते.