Home क्राईम उपनगर हद्दीत गोळीबार करणाऱ्या आरोपीला बेड्या…..गुंडा विरोधी पथकाची पुन्हा उल्लेखनीय कामगिरी……

उपनगर हद्दीत गोळीबार करणाऱ्या आरोपीला बेड्या…..गुंडा विरोधी पथकाची पुन्हा उल्लेखनीय कामगिरी……

0

 

उपनगर हद्दीत गोळीबार करणाऱ्या आरोपीला बेड्या…..गुंडा विरोधी पथकाची पुन्हा उल्लेखनीय कामगिरी……

नाशिक शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथकाची स्थापना करून त्याच्या कामावर दाखविलेला विश्वासामुळे गुंडा विरोधी पथक हे शहरात गुन्हेगारांचे गर्दनकाळ ठरले असून त्यांनी आतापर्यंत नाशिक मधील क्लिष्ट स्वरूपाचे गुन्हे उघड करून त्यातील अट्टल गुन्हेगार यांना अटक केली आहे. 2 फेब्रुवारी रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी बरखा अजय उज्जेनवाल यांना जीवे ठार मारण्यासाठी आरोपींनी गावठी कट्टातून गोळीबार केला होता.

याप्रकरणी भादवी 307, 120(ब), 143, 147, 148, 149, 504, 506 भारतीय हत्यार कायदा 3/25,4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात होता.
गुन्हातील आरोपी गोळीबार करून पळून गेले होते त्यांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर खूप मोठे आव्हान होते. तपास सुरू असताना गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी गुन्हाचा तपास करून गुन्हातील संशयित आरोपी टक्कू उर्फ सनी रावसाहेब पगारे यास गंगापूर गावात सापळा रचून ताब्यात घेतले.
उपनगर पोलीस ठाणे येथील गोळीबार केलेल्या गुन्हातील आरोपीला गुंडा विरोधी पथकाने अटक करून त्याचे नाशिक शहरातील गुन्हेगार वरील वर्चस्व व गुंडा पथकाची कामगिरी पुन्हा सिद्ध करून दिले. या कारवाईमुळे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुंडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार याचे कौतुक केले

सदरची कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस उपायुक्त डॉ सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, तसेच मलंग गुंजाळ, डी के पवार,विजय सूर्यवंशी, सावकार,प्रदीप ठाकरे,अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत,नितीन गौतम,निवृत्ती माळी, गणेश नागरे व सुवर्णा गायकवाड यांनी केली आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version