मटका अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाचा छापा….
छुप्या पद्धतीने शहरात सुरू असलेल्या जुगार व मटका अड्ड्यांवर पोलिसांच्या विशेष पथकाने वक्रदृष्टी केली असून कारवाईत २१ आरोपींना अटक करून सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
विशेष पथकातील अंमलदार भगवान जाधव यांना दत्तनगर, चुंचाळे येथे मटका सरू असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्यानंतर विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ०६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता संदिप पानपाटील यांच्या चाळीच्या समोर, पत्राचे शेडमध्ये, घरकुल रोड, आंबेडकर नगर, चुंचाळे शिवार, नाशिक येथे छापा टाकुन मटका खेळविणारा शाम हरिभाऊ वाघमारे, वय ५० वर्षे, धंदा- व्यापार, रा. साईबाबा नगर, राजरत्न नगर, मोरवाडी, सिडको, नाशिक व खेळणारे इतर २१ आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन जुगाराची साहित्य साधने, रोख रक्कम, मोबाईल फोन व मोटार सायकल असा एकुण ४,८३,५६०/-रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज भालेराव, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, सहायक पोलिस निरीक्षक किरण रोंदळे, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत फड, श्रेणी पोलिस उप निरीक्षक दिलीप भोई, सहायक पोलिस उप निरीक्षक रंजन बेंडाळे, किशोर रोकडे, योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, भगवान जाधव, विठ्ठल चव्हाण, अविनाश फुलपगारे, बाळा नांद्रे, चंद्रकांत बागडे, गणेश वडजे, प्रविण चव्हाण, यांनी केली आहे.