Home क्राईम तडीपार आरोपीला गावठी कट्ट्या सह आणि सिन्नर फाटा हल्ल्यातील ६ हल्लेखोरांना अटक….....

तडीपार आरोपीला गावठी कट्ट्या सह आणि सिन्नर फाटा हल्ल्यातील ६ हल्लेखोरांना अटक….. नाशिकरोड पोलीसांची कारवाई……

0

तडीपार आरोपीला गावठी कट्ट्या सह आणि सिन्नर फाटा हल्ल्यातील ६ हल्लेखोरांना अटक….. नाशिकरोड पोलीसांची कारवाई……

 

पोलीस ठाणे हद्दीत कॉम्बींग ऑपरेशन दरम्यान नाशिकरोड पोलीसांनी तडीपार आरोपीला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक केली तसेच सिन्नर फाटा येथे जुने वादातून दोन इस्मांना जिवे ठार मारणा-याच्या उद्देशाने हल्ला करणा-या ०६ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड परीसरात दुसऱ्या कारवाई दरम्यान रेकॉर्डवरील आरोपी चेक करत असतांना अस्वले मळयाकडून अश्विनी कॉलनीकडे एक संशयित मोटारसायकल भरधाव वेगाने येत असल्याने त्याला थांबविण्याकरीता इशारा केला असता न थांबता त्याने मोटारसायकल भरधाव वेगाने नेत असताना सदर मोटार सायकल स्लीप झाली, मोटारसायकलवरील तीनही इसन खाली पडले त्यांचा पाठलगा केला असताना दोन इसम अंधाराचा फायदा घेवून फरार झाले. तर मोटारसायकलसह एका इसमास ताब्यात घेण्यात आले त्यास मयुर अनिल जानराव दय २१ वर्षे रा. कैलाजी सोसा, जेलरोड, नाशिकरोड असे त्याचे नाव असून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक मोटारसायकल तसेच त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचा लोखंडी क‌ट्टा व एक जिवंत काडतुस मिळुन आले. आरोपीस उपनगर पोलीस ठाणे हद्दीतुन ०२ वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले असून सदर आरोपी हा नाशिक शहर व जिल्हयातून हद्दपार असतांना अवैधरित्या एक देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम ३/२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हेगारांना आला बसावा म्हणून नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत०२ फेब्रुवारी रोजी सहायक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांच्यासह गुन्हेशोध पथकाचे कर्मचाऱ्यांनी सिन्नरफाटा, अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड परीसरात कॉम्बीग ऑपरेशन राबविण्यात आले होते. या कारवाईमध्ये यादरम्यान नाशिकरोड पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपींना सिन्नरफाटा हद्दीत शोध घेत असतांना संशयित आरोपी राजिक युनिस शेख वय १९ वर्षे आकाश उर्फ निखील राजेंद्र घोडेराव ,अमन जाहिद शेख, सोहेल फिरोज शेख बन्या उर्फ निरंक नागु नरोटे , इमरान अफसर शेख हे मिळुन आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. हुसेन फिरोज शेख याच्यावर नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण, जबरी चोरी, खंडणी, दरोडा या सारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर यापुर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे.

सदरची नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, विजय टेमगर, विष्णु गोसावी, मनोहर कोळी, नाना पानसरे, अरूण गाडेकर, संतोष पिंगळ, यशराज पोतन, भाऊसाहेब नागरे, सागर आडणे, कल्पेश जाधव, गोकुळ कासार, रोहित शिंदे, योगेश रानडे आदींनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version