Home क्राईम सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात…… क्राईम युनिट 2 ची कामगिरी……. 6 लाखाचा मुद्देमाल...

सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात…… क्राईम युनिट 2 ची कामगिरी……. 6 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

0

सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात…… क्राईम युनिट 2 ची कामगिरी……. 6 लाखाचा मुद्देमाल हस्तगत…..

तीन वर्षांपासुन पोलीसांना गुंगारा देणारा अट्टल सोनसाखळीचोर अखेर मोपेड बाईकसह क्राईम युनिट – ०२ च्या ताब्यात.

शहर परिसरात सोनसाखळी चोरीच्या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे पोलिसांनी सोनसाखळी चोरांवर लक्ष केंद्रित करून तपास सुरू असताना परमेश्वर दराडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून २५ जानेवारी रोजी युनिट 2 च्या टीमने गिताराम आसाराम रणपिसे, वय. ३२ वर्षे, रा-साठेनगर, गल्ली नं-५, वडाळा गांव, इंदिरानगर, नाशिक या संशयितास ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्याने नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील इंदिरानगर पोलिस ठाणे ४ गुन्हे, अंबड पोलिस ठाणे ०३ गुन्हे, उपनगर पोलिस ठाणे ०२ गुन्हे, पंचवटी पोलिस ठाणे ०१ गुन्हा व म्हसरूळ पोलिस ठाणे ०१ गुन्हा असे एकुण ११ चैनस्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून एकुण १२५ ग्रॅम सोने, ०१ ज्युपिटर कंपनीची मोपेड मोटार सायकल असा एकुण ६,०३,७५०/-रू. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव सो, सहा. पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट कं. २ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस उप निरीक्षक संदेश पाडवी, सहायक पोलिस उप निरीक्षक यशवंत बेडकोळी, विवेक पाठक, परमेश्वर दराडे, सुनिल आहेर चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, नंदकुमार नांदुर्डीकर, राजेंद्र घुमरे, गुलाब सोनार, सुहास क्षिरसागर, विजय वरंदळ, पो. अं. तेजस मते, सोमनाथ जाधव, जितेंद्र वजीरे आदींनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version