Home Uncategorized ज्येष्ठ महिलेला जखमी करून दागिने लुटमार करणारा खुनाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात…… गुन्हेशाखा...

ज्येष्ठ महिलेला जखमी करून दागिने लुटमार करणारा खुनाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात…… गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगिरी…..

0

ज्येष्ठ महिलेला जखमी करून दागिने लुटमार करणारा खुनाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात…… गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगिरी…..

जून महिन्यात लोखंडे मळा येथे जेष्ठ नागरीक महीलेचा घरात घुसुन खुन करणारा व १ जानेवारी २०२४ रोजी महीलेस जखमी करून तीचे दागिने लुटणारा संशयित आरोपीस जेरबंद करून खुनाचा गुन्हा उघडकीस करण्यात आला आहे.

०१ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास सर्वेश्वर क्लॉथ स्टोअर्स सामनगांव नाशिक या ठिकाणी जेष्ठ महीला नागरीक हिस गंभीर जखमी करून तीचे अंगावरील दागिने लुटुन आरोपी पळून गेला होता. नाशिक रोड पोलीस ठाण्यात भादवि कलम ३९७, ५०६ मपोकाक १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा जेष्ठ नागरिक महीले बाबत असल्याने तो तात्काळ उघडकीस आणणे बाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णीक यांनी नाशिकरोड पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा यांना सुचना दिल्या होत्या.

गुन्हेशाखा युनिट ०१ व ०२ व नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक सातत्याने तपास करून गुन्हा घडला त्या परिसरातील सिसिटिव्ही फुटेज तपासुन व तांत्रीक विश्लेषणव्दारे गुन्हा करणाऱ्या आरोपीची गोपनीय बातमीदार मार्फत जेलरोड परिसरात राहणाऱ्या विशाल प्रकाश गांगुर्डे हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. संशयित आरोपी हा फरार असल्याने त्यावर गुन्हे शाखा युनिट -१ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलिस उप निरीक्षक रविंद्र बागुल, पोलीस अंमलदार प्रविण वाघमारे, नाजीम पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, यांचे पथक हे रात्रंदिवस आरोपीच्या मागावर होते पण आरोपी हा वेष बदलुन त्याच्या जागा व ठावठिकाणा बदलत असे, तो देवळा, कळवण, वापी-गुजरात, वाडा, विक्रमगड, जोगेश्वरी, विरार-भाईदंर अशा विविध ठिकाणी लपत होता, त्याचा पाठलाग करीत असताना कसारा येथे असल्याची बातमी सहायक पोलिस उप निरीक्षक बागुल यांना मिळाल्याने पथकाने शिताफीने पकडून ताब्यात घेतले.

जुन २०२३ मध्ये लोखंडे मळा उपनगर पोलीस ठाणे हददीत एका जेष्ठ नागरीक महीलेच्या घरात घुसुन तीचे दोगीने लुटत असतांना तीला जिवे ठार मारले होते. सदरचा आरोपी हा अज्ञात होता. त्याचा कोणताही सुगावा लागत नव्हता. परंतु सदरच्या गुन्हयाची पध्दत व वर नमुद नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गुन्हयाची पध्दत एकच असल्याने गुन्हेशाखा युनिट ०१ च्या पथकाने आरोपीकडे सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यानेच केल्याची कबुली देऊन त्याची प्रात्यक्षिक करून दाखविले.

आरोपीने आणखी काही गुन्हे केले आहेत काय बाबत चौकशी केली असता त्याने त्याचे नातेवाईकांकडे चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. यातील आरोपीला जुगार खेळण्याचा नाद होता, त्यासाठी त्यास पैशाची गरज असल्याने त्याने सदरचे गुन्हे केलेले आहेत असे निष्पन्न झाले. आरोपीने आणखी गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न होण्याची शक्यता आहे असल्याने आरोपीस पुढील कारवाई कामी नाशिकरोड पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक व पोलीस उप-आयुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलिस उप निरीक्षक चेतन श्रीवंत, विष्णु उगले, सहायक पोलिस उप निरीक्षक रविंद्र बागुल, पोलीस अंमलदार प्रविण वाघमारे, नाजीम पठाण, विशाल काठे, महेश साळुंके, विजयकुमार सुर्यवंशी, प्रदीप म्हसदे, शरद सोनवणे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, अमोल कोष्टी आदींनी संयुक्त रित्या केलेली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version