प्रभू श्री राम मंदिर लोकार्पण सोहळा….मुक्तिधाम मंदिरात महाआरती सप्ताह….. २२ जानेवारीला महाप्रसाद…..
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम मंदिराचा न भुतो न भविष्यति लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. लोकार्पण सोहळा निमित्त नाशिकरोड येथील मुक्तिधाम मंदिरात महाआरती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ जानेवारी ते २२ जानेवारी दररोज सकाळी ११.३० वा आणि सायंकाळी ६.३० वाजता श्री राम भक्तांच्या हस्ते महाआरती होणार आहे. दररोज सकाळी विविध मान्यवर आणि सायंकाळी समाज बांधवांतर्फे महाआरती होणार आहे. २२ जानेवारी मंदिर लोकार्पण या पावन दिवशी सकाळी ९ ते दुपारी १२.३० पर्यंत पंडित ओमकार वैरागकर यांचे प्रभू श्री रामाचे भजन सादर होणार आहे, त्यानंतर दुपारी भाविकांसाठी महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, सायंकाळी ५ वाजता ताल रुद्र ढोल पथक वाद्य त्यानंतर ६ वाजता दीपोत्सव आणि ७.३० वाजता भव्य आतिषबाजी करून मंदिर लोकार्पण निमित्त महादिवाळी साजरी होणार आहे.
मंगळवार १६ जानेवारी रोजी सकाळी चर्मकार समाजातर्फे माजी आमदार बबन घोलप, सायंकाळी शीख समाज, बुधवार १७ जानेवारी रोजी सकाळी राष्ट्रवादीचे निवृत्ती महाराज अरींगळे, शिवसेनेचे दत्ता गायकवाड, विजय करंजकर, सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव समिती, गुरुवार १८ जानेवारी रोजी सकाळी खासदार हेमंत गोडसे, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, शुक्रवार १९ जानेवारी रोजी सकाळी भाजपचे आमदार राहुल ढिकले, शांताराम घंटे, पवन पवार सायंकाळी पाटीदार समाज, शनिवारी २० जानेवारी रोजी सकाळी माजी महापौर अशोक दिवे, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, राहुल दिवे तर सायंकाळी समस्त सिंधी समाज, रविवार २१ जानेवारी रोजी सकाळी बालाजी सोशल फाऊंडेशन आणि विश्व हिंदू परिवार तर सायंकाळी वाल्मीक समाज आणि सोमवार २२ जानेवारी मंदिर लोकार्पण दिवशी सकाळी मुक्तीधाम ट्रस्ट परिवार आणि सायंकाळी नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके आणि उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांच्या हस्ते महा आरती होणार आहे.