चोरीस गेलेल्या ५० सिमेंटच्या गोण्या, एका आरोपीकडून धारदार कोयता जप्त……
वेगवेगळ्या गुन्हयांमध्ये ०६ आरोपी अटकेत……
नाशिकरोड पोलीसांची कारवाई…..
नाशिक शहरात दहशत निर्माण करणारे, चोरी घरफोडी करणारे, तसेच नायलॉन मांजाची विक्री पोलिसांनी लक्ष केंद्रित करून नाशिकरोड पोलीसांनी मागील आठवडाभरात कारवाई करून
१ जानेवारी रोजी प्रितेश शिवनारायण सोमानी वय ३८ वर्षे, रा. निलगीरी सोसायटी, दत्तमंदिर, नाशिकरोड, नाशिक यांनी त्यांचे ट्रक एम. एच. ४६ एफ ६०४१ मधून सिमेंटच्या १०० गोण्यांची चोरी झाल्याबाबत तक्रार दिल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिकरोड पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकातील सपोनि गणेश शेळके, विजय टेमगर व पथक यांना गुन्हयाचे तपासात सदर गुन्हा हा गुड्डू उर्फ आयुब पठाण बुर महोम्मद याने केल्याचे निष्पन्न झाल्याने मनोहर कोळी, अरूण गाडेकर, नाना पानसरे व भाउसाहेब पानसरे यांनी आरोपीचा शोध घेवून त्यास अटक करून आरोपीकडून ५० सिमेंटच्या गोण्या जप्त केल्या.
३१ डिसेंबर रोजी नववर्षाच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या बंदोबस्तादरम्यान गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार पेट्रोलिींग दरम्यान नाशिकरोड पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये एक इसम कोयता घेवुन दहशत निर्माण करीत आहे अशी बातमी मिळाल्याने सहायक पोलिस निरीक्षक गणेश शेळके व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावून संशयित हितेश सुभाष डोईफोडे वय-२४ वर्षे, रा. पेढारकर कॉलनी, जेलरोड, नाशिकरोड, नाशिक यास कोयत्यासह ताब्यात घेवुन त्याचेविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
०२ डिसेंबर रोजी नाशिकरोड पोलीस स्टेशन हद्दीत दरोडयाच्या तयारीत असणा-या आरोपींचा पाठलाग करून नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने दोन आरोपींना अटक करून भादवि ३९९, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. गुन्हयातील तीन आरोपी हे गुन्हा घडल्यापासुन फरार होते. सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक गणेश शेळके व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार हे तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करीत असतांना तीन संशयित आरोपी सुरज संजय काकडे रा. पवारवाडी, नाशिकरोड, नाशिक, रोहन सुभाष जाधव रा. गाडेकर मळा, नाशिकरोड, नाशिक, हितेश सुभाष डोईफोडे रा. पेंढारकर कॉलनी, जेलरोड, नाशिकरोड, नाशिक यांचा शोध घेवुन त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली.
गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी नायलॉन मांजाची विक्री करणारे आरोपी बामे साईल मंगेश लोहारकर रा. सैलानीबाबा, बेलरोड, नाशिकरोड, नाशिक आणि मेहुल महेश उगरेनीया रा. बेलरोड, नाशिकरोड, नाशिक येथे छापा टाकून त्यांचेकडून ११,२००/- रूपयांचा नायलॉन मांजा जप्त करून त्यांचेविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम १८८, सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णीक, पोलीस उप आयुक्त श्रीमती मोनिका राउत, व सहायक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग आनंदा वाघ यांचे मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, विजय टेमगर, विष्णु गोसावी, सागर आडणे, गोकुळ कासार, कल्पेश जाधव, रोहित शिंदे, अरुण गाडेकर, मनोहर कोळी, बाना पानसरे, वशराम पोतन, संतोष पिंगळ, रानडे आदींनी केली आहे.