Home क्राईम रेल्वेच्या पार्किंग मधूनच दुचाकी गाडीची चोरी

रेल्वेच्या पार्किंग मधूनच दुचाकी गाडीची चोरी

0

रेल्वेच्या पार्किंग मधूनच दुचाकी गाडीची चोरी

नाशिक रोड प्रतिनिधी येथील देवी चौकात असलेल्या रेल्वेच्या पार्किंग मधूनच दू चाकी गाडी चोरी झाल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय वसुदेव गोसावी राहणार लवटे नगर जय भवानी रोड नाशिक रोड हे मुंबई येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात नोकरीला असून ते नेहमी अपडाऊन करतात नेहमीप्रमाणे आपली दुचाकी हिरो होंडा गाडी क्रमांक एम एच 15 सी एच 23 67 या क्रमांकाची गाडी सकाळी देवी चौकातील पीडब्ल्यूडी पार्किंग मध्ये लावली व त्यानंतर पंचवटी एक्सप्रेस ने ते ड्युटी साठी निघून गेले त्यानंतर रात्री ड्युटीवर परत आल्यानंतर गाडी घेण्यासाठी पार्किंग मध्ये आले असता त्यांना आपली गाडी मिळून आली नाही त्यानंतर त्यांनी गाडीचा शोध घेतला पण गाडी कुठेच मिळून ना आल्याने अखेर त्यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन गाठले व गाडी चोरी झाल्याची तक्रार दाखल केली नाशिक रोड पोलिसांनी त्यांच्या या तक्रारीनुसार चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version