Home क्राईम देवळाली गावात पुन्हा गाड्यांची तोडफोड….. साक्षीदाराच्या घराची तोडफोड….. पाच संशयित आरोपी पोलिसांच्या...

देवळाली गावात पुन्हा गाड्यांची तोडफोड….. साक्षीदाराच्या घराची तोडफोड….. पाच संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात…..

0

देवळाली गावात पुन्हा गाड्यांची तोडफोड….. साक्षीदाराच्या घराची तोडफोड….. पाच संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात…..

उपनगर हद्दीतील देवळाली गावात रात्री १ वाजेच्या दरम्यान पुन्हा गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्यात आली. मागील भांडणाच्या कुरापत काढून एकाला मारण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयित आरोपींनी परिसरात दहशत माजविली. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी आतिश सोन्याबापू जंगम तसेच पत्नी कविता भाऊ चिवराज जंगम, तसेच आई लता जंगम व दोन लहान मुले हे सर्वजण झोपलेलो असताना सोसायटीमधुन बाहेरून मोठ-मोठ्याने शिवीगाळ करीत ये आबा पवार बाहेर ये, आंम्हाला दम देतो का असे म्हणुन मोठमोठ्याने ओरडुन आवाज आल्याने त्यांनी बाहेर येवून पाहीले असता परिसरात राहणारे गुरुज भालेराव, अश्रफ मनियार, साहील नायर तसेच त्यांचे सोबत असलेले इतर तीन ते चार लोक हातात कोयते तलवार व लोखंडी रॉड घेवुन आबा पवार यांच्या घराचा दरवाजा तोडुन आबा पवार याला विविगाळ करीत होते. त्यातील सुरज भालेराव, अश्रफ मनियार, साहील नायर व त्यांचे सोबत तीन ते चार जणांनी आबा पवार यांचे घरात प्रवेष करून आतील सामानाची तोडफोड केली, आबा पवार यांच्या घरात कोणी नसल्याचे पाहून ते लोक खाली आले व आबा पवार याला मोठमोठ्याने शिविगाळ करून त्यांचे हातातील कोयत्याने घरासमोर पार्क केलेली वाघोली यांची पिकअप तसेच किषोर सिसोदे यांची वेरना या चारचाकी गाडयाच्या पुढिल काचा फोडुन गाडयांचे नुकसान केले. काही महिन्यांपूर्वी देवळाली गाव महात्मा गांधी पुतळा जवळ सलून मध्ये एकावर हल्ला करण्यात आला होता. आबा पवार हे त्याप्रकरणी साक्षीदार होते. संशयित हा एक दिवसापूर्वीच जेल मधून सुटला आणि पुन्हा दहशत मजविण्याचा प्रकार केला.


गावीतील अषोक पिरोडे, सचिन देषमुख बाळासाहेब जगम, नियाज अली सैय्यद, जगदीश थाधोले असे जागे झाल्याचे पाहुन सुरज भालेराव, अश्रफ मनियार, साडील नायर असे त्यांनी आणलेल्या दोन मोटार सायकल वर बसुन आरडाओरडा करीत व्यवहारे यांचे बिल्डींग कडे निघुन गेले. त्यांचे हातात कोयते असल्यामुळे कोणीही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला नाही. जातांना त्यांनी गल्लीत पार्क केलेल्या सर्व मोटार सायकल तसेच कार च्या काचा हातातील कोयत्याने व लोखंडी रॉडने फोडुन तेथुन निघुन गेले.


आबा पवार याने एक महीन्यापुर्वी सुरज भालेराव याला मारहाण केल्याचा राग मनात धरून आबा पवार याला मारहाण करण्याच्या उद्देशाने घराचे दरवाजा तोडुन आत प्रवेष केला व आतील सामानाची तोडफोड केली, हातातील कोयता, तलवार व लोखंडी रॉडने तोडफोड करून नुकसान केले, तसेच हातात धारदार शस्त्र घेवून दहशत निर्माण करून पळून गेले. तोडफोड प्रकरणी अतिश सोन्याबापु जंगम किशोर शिसोदे, बाळासाहेब जंगम, तुशार शिंदे, अशोक शिरोडे, जगदीश वाघोले यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात सुरज भालेराव, अश्रफ मनियार, साहील नायर आणि त्यांचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलो आहे. वारंवार होणाऱ्या तोडफोडीच्या घटनांनी देवळाली गाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उपनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत पाच संशयितांना अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version