Home क्राईम नववर्षाच्या पूर्वसंध्येला टवाळखोरांवर कारवाई….. पोलिस आयुक्तांची चोख बंदोबस्त

नववर्षाच्या पूर्वसंध्येला टवाळखोरांवर कारवाई….. पोलिस आयुक्तांची चोख बंदोबस्त

0

नववर्षाच्या पूर्वसंध्येला टवाळखोरांवर कारवाई….. पोलिस आयुक्तांची चोख बंदोबस्त……

३१ डिसेंबर नववर्ष पूर्व संध्ये निमीत्त लावण्यात आला चोख बंदोबस्त सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणा-या टवाळखोर इसमांवर व मद्यपींवर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालय हददीत ३१ डिसेंबर २०२३ रोजी नववर्ष पूर्व संध्या कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्याकरीता चोख बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांना प्रत्येक पोलीस ठाण्यात फिक्स पॉईन्ट, नाकाबंदी व पेट्रोलिंग बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणारे व मद्यपान करुन शांतता भंग करणारे इसम तसेच मद्यपान करुन वाहन चालविणारे इसम तसेच मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणारे इसमांविरुध्द कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते.


आयुक्तालयातील १३ पोलीस ठाणे हद्दीत ६५ ठिकाणी फिक्स पॉईन्ट बंदोबस्त, ३० ठिकाणी नाकाबंदी पॉईन्टचे आयोजन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्यात ५ वाहने पेट्रोलिंग करीता अशी एकुण ६५ वाहने गस्ती करीता तैनात करण्यात आले होते.

बंदोबस्त करीता तैनात करण्यात आलेल्या अधिकारी व अंमलदार यांनी नववर्ष पुर्व संध्येला उपद्रव करणा-या इसमांविरुध्द कारवाई केली. त्यामध्ये आडगांव, पंचवटी, म्हसरुळ, भद्रकाली, मुंबईनाका, सरकारवाडा, गंगापुर असे परिमंडळ -१ कार्यक्षेत्रात १५१ टवाळ खोर व ६३ रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच अंबड, सातपुर, इंदिरानगर, उपनगर, नासिकरोड, देवळाली कॅम्प, एमआयडीसी चुचांळे असे परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात १६३ टवाळखारे व ६८ रेकॉर्डवरील गुन्हेगार अशा एकुण ४४५ इसमांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

मोटार वाहन कायदा कलमाचे उल्लंघन करणारे हेल्मेट, सीट बेल्ट, ट्रिपल सीट, ब्लॅक फ्लिम, नो एंट्री आदी नियम तोडणाऱ्या वाहनधारकांविरुध्द कारवाई करण्यात येऊन दोन लाख रुपये दंड वसूल करण्यात आले.त्याचबरोबर मद्यपान करुन वाहन चालवुन मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणा-या २२ इसमांविरुध्द मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

नववर्ष पुर्व संध्येच्या निमीत्ताने लावण्यात आलेल्या बंदोबस्तादरम्यान संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत ०६ सहा. पोलीस आयुक्त, ५९ पोलीस निरीक्षक, ९२ सहा. पोलीस निरीक्षक, पोलिस उप निरीक्षक, ८८४ पोलीस अंमलदार, ५०० होमगार्ड यांनी सहभागी होवून नववर्ष शांततेत पार पाडला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version