Home ताज्या बातम्या दिशादर्शक फलक झाकल्याने पर्यटकांचे हाल….. पोलीस व मनपा आयुक्तांच्या आदेशाला केराची...

दिशादर्शक फलक झाकल्याने पर्यटकांचे हाल….. पोलीस व मनपा आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

0

दिशादर्शक फलक झाकल्याने पर्यटकांचे हाल….. पोलीस व मनपा आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

नाशिक शहरात देवदर्शन घेण्यासाठी तसेच पर्यटन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशभरातून भाविक व पर्यटक येत असतात. नाशिक महानगर पालिकेच्या वतीने शहराच्या वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी आपले गंतव्य पर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक लावलेले आहेत

परंतु या फलकावर गेल्या काही दिवसापासून दादा मामा बॉस नाना अण्णा यांच्या नावाचे व वाढदिवसाचे फलक सतत लावलेले असतात. रोज कुणाचा तरी वाढदिवस किंवा हार्दिक शुभेच्छानी झाकले जात असतात. नाशिक शहराची नव्याने सूत्र हाती घेतलेल्या पोलीस व महापालिका आयुक्तांनी सदरचे फलक काढण्यासंदर्भात कडक धोरण स्वीकारले व हे फलक काढण्याचे आदेश देऊन त्यांच्यावर कारवाई केली पण या घटनेला काही दिवस उलटत नाही तर नाशिक रोडच्या जेलरोड व इतर भागातील दिशादर्शक फलक पुन्हा वाढदिवसाचे बोर्ड लावून झाकले जात असल्यामुळे
पोलीस व महापालिका आयुक्तांच्या आदेशाला संबंधितांनी केराची टोपलीच दाखविल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

नाशिक रोड परिसरातील जेल रोड रस्त्यावर जे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे ते वारंवार वाढदिवसाच्या पुढार्‍यांच्या फलकांनी झाकले गेलेले असतात त्यामुळे शहरात येणाऱ्या नागरिकांना हे फलक दिसत नाही त्यामुळे त्यांना ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणचे पत्ता शोधण्यात वेळ वाया जातो.

स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या दत्तमंदिर जवळ सुरुवातीला असलेले दिशा दर्शक फलक गेल्या अनेक महिन्यांपासून काढून ठेवलेले असून ते पुन्हा उभे करावे तसेच सदरचे दिशादर्शकावरील फलक काढण्यासंदर्भात पोलीस व मनपा ने कठोर निर्णय घ्यावा त्याचप्रमाणे जे कोणी फलक लावून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करून दिशादर्शक फलक वाढदिवस हार्दिक शुभेच्छा आणि इतर फळकांपासून मोकळे करावेत अशी मागणी नागरिक करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version