Home क्राईम लुटमार करणाऱ्या आरोपींना उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या…. तीन आरोपी अटकेत….. एक लाख...

लुटमार करणाऱ्या आरोपींना उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या…. तीन आरोपी अटकेत….. एक लाख चाळीस हजार रुपये हस्तगत

0

लुटमार करणाऱ्या आरोपींना उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या…. तीन आरोपी अटकेत….. एक लाख चाळीस हजार रुपये हस्तगत…..

घातक हत्याराने जखमी करून १,६८,०००/- रू रोख रक्कम लुटणा-या आरोपींना उपनगर पोलीसांनी अटक केली आहे. १८ डिसेंबर रोजी रात्री १०:१५ वा. प्रकाश बन्सी मरसाळे हा नेहमी प्रमाणे कंपनीची उधारीची रक्कम गोळा करून मोटार सायकल वरून वडनेर पाथर्डी रोडने विहीतगाव कडे येत असताना साई ग्रँड लॉन्स समोर, वडनेर पाथर्डी रोड याठिकाणी एका पांढ-या चारचाकी वाहनामध्ये चार जणांनी येवून प्रकाशच्या मोटार सायकलला कट मारून त्याला थांबवले.

तसेच चारचाकी वाहनाच्या खाली उतरून प्रकाश याच्याकडून उधारीची रक्कम असलेली बॅक ओढण्याचा प्रयत्न केला प्रकाशने बॅग देण्यास विरोध गेला असता आरोपीने त्यांच्या कडील कोयत्याने प्रकाशचे डोक्यात वार करून त्याला जखमी केले. सदर बॅगेतील रोख रक्कम १,६८,००० रू. सह बॅग बळजबीने हिसकावुन पळुन गेले होते. उपनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी प्रकाश मरसाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भादवी ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकास रवाना करण्यात आले होते.

उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे व पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनानुसार उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी व अंमलदार विनोद बाबु लखन, सोमनाथ पांडुरंग गुंड, अनिल भागवत शिंदे, जयंत परशराम शिंदे, पंकज भास्कर कर्पे, सुरज रामनाथ गवळी, सौरभ शशिकांत लोंढे, संदेश विलास रघतवान, राहुल हिरामण जगताप असे दोन वेगवेगळया गटात पोलीस पथक संशयित आरोपीचा शोध घेण्यास रवाना झाले.

गुन्हे शोध पथकाचे गुंड व जयंत शिंदे यांनी गुप्त बातमीदार यांच्या मदतीने रोकडोबावाडी परीसरातील दोन संशयित फरार असल्याची माहिती मिळवून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तेच आरोपी असल्याची खात्री झाल्याने आरोपींचा शोध घेवून त्यांना शिताफिने पकडुन
ताब्यात घेतले. चंद्रकांत विजय काकडे, वय-२३, रा. काकडे गल्ली, रोकडोबावाडी, नाशिकरोड, नाशिक, शाहबाज शफि शेख, वय-२१, रा. मदिना नगर, रोकडोबावाडी, नाशिकोड, नाशिक, सोनु छबु गवळी, वय-२०, रा. रोकडोबावाडी, देवळाली गाव, नाशिकरोड असे या संशयितांची नावे असून आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून चोरी झालेल्या रकमे पैकी १,४०,०००/- रू रोख रक्कम तसेच गुन्हयात वापरलेली हयुंडई २० कार एम एच १२ जीबी ६७०४ हस्तगत करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक शांताराम महाजन व गोविंद दत्तात्रय भामरे हे करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version