नाशिकरोडला वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू…….
नाशिक रोड परिसरात तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाले असून त्यामध्ये एका पारीचारिकेचा समावेश आहे.
येथील बिटको चौकात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री साधारण आठ वाजेच्या सुमारास दुचाकी चालक गुलाम मुस्तफा शहा हे आपली दुचाकी गाडी क्रमांक एम एच 15 इ डब्ल्यू 89 16 या गाडीवरून जात असताना त्यांना छोटा हत्ती गाडी क्रमांक एम एच 04 इ बी 1268 यांची ठोस बसल्याने या अपघातात गुलाम शहा हे जागीच ठार झाले अपघात घडल्यानंतर उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती दरम्यान ही घटना समजताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सुधीर दूमरे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केले .
दुसऱ्या एका अपघातात नाशिक महापालिकेच्या दसक येथील रुग्णालयात परिचारिकेचे काम करणाऱ्या प्रिया चंद्रपाल पवार वय 34 राहणार पाथर्डी गाव उमेश नगर या रात्रपाळीच्या ड्यूटीसाठी घरून पाथर्डी गाव येथून रीक्षा क्रमांक एम एच 15 ए के 59 75 या रिक्षाने विहित गावकडे येत असताना सदरची रिक्षा वडनेर गावाजवळ येताच पलटी झाली त्यानंतर रिक्षात बसलेल्या प्रिया पवार उर्फ जाधव या रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला तर रिक्षा चालक संजय पगारे हे सुद्धा अपघातात जखमी झाला सदरचे घटना घडल्यानंतर अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली त्यानंतर माजी नगरसेवक जगदीश पवार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी प्रिया पवार यांना उपचारासाठी रुग्णालात दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात ठार झालेल्या प्रिया पवार उर्फ जाधव या महापालिकेच्या दसक येथील रुग्णालयात पारिचारिका म्हणून काम करत होत्या त्यांच्या पश्चात पती दोन मुले सासू सासरे असा परिवार आहे.
त्याचप्रमाणे आणखी एका अपघातात सुभाष रोड येथे रस्त्याने पायी जाणारे किशोर गणपत शिंदे वय 65 यांना मोपेड गाडी क्रमांक एम एच 15 ए झेड या गाडीची जोरदार ठोस बसल्याने ते जबरदस्त जखमी झाले त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणे पोलीस नाईक आशिष गायकवाड यांनी तक्रार दाखल केली असून मोपेड दुचाकी गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही अपघातांचे पोलिस तपास करीत आहेत.