Home क्राईम नाशिक रोडच्या गोसावी वाडीत संतप्त टोळक्याची तुफान दगडफेक

नाशिक रोडच्या गोसावी वाडीत संतप्त टोळक्याची तुफान दगडफेक

0

नाशिक रोडच्या गोसावी वाडीत संतप्त टोळक्याची तुफान दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा राग येऊन संतप्त झालेल्या गाडी चालकाने आपल्या मित्रांना आणले व त्यानंतर या टोळक्याने हातात काठ्या कोयते व लाकडी दांडुक्या घेऊन तसेच परिसरात तुफान दगडफेक करून दहशत निर्माण केले या घटने प्रकरणे नाशिक रोड पोलीस ठाण्यात नऊ ते दहा जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार गोसावी वाडी येथे घडला. दरम्यान या दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

याबाबतचे वृत्त असे की येथील गोसावी वाडी परिसरात सोनाली रवींद्र पिंपळे या राहतात या ज्या ठिकाणी राहतात त्या रस्त्यावरून गुड्ड्या गोसावी नावाचा युवक मोटर सायकल घेऊन जोरात जात येत होता यावेळी सोनाली पिंपळे या गुड्ड्या गोसावी याला म्हणाल्या की तो गाडी हळू चालव गल्लीत लहान मुले खेळत असतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे पिंपळे यांच्या बोलण्याचा गोसावी याला राग आला त्यानंतर त्याने आपले मित्र राजेंद्र सोनटक्के निशांत भारती योगेश जाधव ओम रमेश काळे पवन अहिरे शाहिद शेख अमन शेख नवज्योत सुमन पुजारी यांना ही घटना सांगितली त्यानंतर हे सर्वजण हातात काठ्या कोयते लाकडी दंडुके घेऊन आले व दहशत निर्माण केली त्यानंतर परिसरातील घरावर तुफान दगडफेक केली यामुळे परिसरात घबराट झाली होती. दरम्यान या घटने प्रकरणी सोनाली पिंपळे यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात येऊन याबाबत तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनंतर पोलिसांनी या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version