Home Uncategorized शौचास गेलेल्या नऊ वर्षाच्या लहानग्या मुलावर बिबट्याचा हल्ला….. पाण्याचा डब्बा फेकून मारल्याने...

शौचास गेलेल्या नऊ वर्षाच्या लहानग्या मुलावर बिबट्याचा हल्ला….. पाण्याचा डब्बा फेकून मारल्याने बिबट्याने धूम ठोकली……

0

शौचास गेलेल्या नऊ वर्षाच्या लहानग्या मुलावर बिबट्याचा हल्ला….. पाण्याचा डब्बा फेकून मारल्याने बिबट्याने धूम ठोकली……

शौच्यास बसलेल्या शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला करुन जखमी केले. जखमी मुलाला बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मुलाची प्रकृती स्थिर आहे. अभिषेक सोमनाथ चारसकर हा
पिंपळगाव खांब येथील रहिवासी सोमनाथ चारसकर व आरती चारसकर या शेत मजुराचा मुलगा आहे. पिंपळगाव खांब येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत इयत्ता चौथी मध्ये तो शिकत असून रविवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास दाढेगाव रोड, भैरवनाथ मंदिरा मागे तो शौच्यास बसलेला होता.

नदी किनारावरून अचानक एका बिबट्याने अभिषेकवर हल्ला करून जखमी केले मात्र जखमी असतानाही या मुलाने जोरदार प्रतिकार करून आपल्या जवळ असलेल्या शौचाचा पाण्याने भरलेला डबा बिबट्याच्या तोंडावर मारून आरडाओरड केली. डब्ब्याचा फटका तोंडावर लागल्याने बिबट्याने पळ काढला. यावेळी दुसरा बिबट्याही तेथील झाडीत होता. नागरिक धावून आल्याने त्यानेही धूम ठोकली. या हल्ल्यात अभिषेकच्या बसण्याच्या जागेवर जबर जखम झाली आहे. माजी नगरसेवक जगदीश पवार यांना घटना समजताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अभिषेकला नाशिक रोड येथील बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

मुलाच्या धाडसाचे कौतुक होत आहे. पिंपळगाव खांबसह दाढेगाव, वडनेरगेट, देवळाली, विहीतगाव परिसरात बिबट्यांचे साम्राज्य वाढले आहे. गेल्या महिन्यात वडनेर गेटला एकाचवेळी तीन बिबटे आढळले होते. नाशिकरोडच्या आनंदनगर भागात बिबट्याने भरवस्तीत डॉक्टरांचा कुत्रा पळवला होता. जयभवानीरोड येथे बंगल्याच्या आवारात बिबट्या आला होता. पिंपळगाव परिसरात वालदेवी नदी व शेती आहे. पश्चिमेला लष्करी भागात दाट जंगल आहे. अनुकूल परिस्थितीमुळे बिबट्यांचा वावर वाढला असून ते नागरी वस्तीत दिवसाही अतिक्रमण करत आहेत. नागरिकांनी दिवसा आणि रात्री बाहेर पडणे अवघड झाले आहे. विद्यार्थी, महिला, शेतकरी आदींना जगणे अवघड झाले आहे. वन विभागाने त्वरित पिंजरे लाऊन बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version