Home क्राईम दत्तमंदिरातील चोरीस गेलेल्या देवतांच्या मूर्ती हस्तगत….. एक संशयित अटकेत…..

दत्तमंदिरातील चोरीस गेलेल्या देवतांच्या मूर्ती हस्तगत….. एक संशयित अटकेत…..

0

दत्तमंदिरातील चोरीस गेलेल्या देवतांच्या मूर्ती हस्तगत….. एक संशयित अटकेत…..

नाशिक पुणे रस्त्याजवळ असलेल्या शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध दत्त मंदिरातील चोरी गेलेल्या पंचधातू आणि चांदीच्या हिंदू देवतांच्या मूर्ती पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत हस्तगत केल्या आहेत.

यामुळे मंदिराचे विश्वस्त तसेच स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.येथील प्रसिद्ध असलेल्या दत्त मंदिरातील मूर्ती चोरीला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या संदर्भात उपनगर पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मूर्ती हस्तगत करण्यासाठी शोध सुरू केल्यानंतर तपासात मूर्तीचा शोध घेऊन मोठ्या शिताफीने मूर्ती हस्तगत केल्या. उपनगर पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मूर्ती ताब्यात मिळाल्याने भाविकांनी उपनगर पोलिसांचे आभार मानले.

उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे ,गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक दुकळे,पोलीस अंमलदार विनोद लखन यांच्या कारवाईत पंचशील नगर येथून एका आरोपीला ताब्यात घेऊन मूर्ती हस्तगत करण्यात आल्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version