Home क्राईम नाशिक शहरात गुन्हेगारांना आवरण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन…….पोलिस आयुक्त ऍक्शन मोडवर…..

नाशिक शहरात गुन्हेगारांना आवरण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन…….पोलिस आयुक्त ऍक्शन मोडवर…..

0

 

 

नाशिक शहरात गुन्हेगारांना आवरण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन…….पोलिस आयुक्त ऍक्शन मोडवर…..

 

 

नाशिक शहरात सतत होणाऱ्या खुनाच्या घटना घडत असल्याने गुन्हेगारांनीच शहराचा ताबा घेतला असा प्रश्न नागरिकांना पडत होता. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर आयुक्तालयाच्या हद्दीत आयुक्त पदाची धुरा सांभाळताच दोन खुनाच्या घटनेने शहर परिसर हादरून गेले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या घटनांची गंभीर दखल घेत शहरात गुन्हेगारांची धरपकड करण्यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कोंबिंग तसेच ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यास सुरुवात करण्यात आली, त्याचबरोबर मद्यपान करून रस्त्यावर टवाळकी करणारे तळीरामांना देखील खाकीने चांगलाच दणका देण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहरात गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी ग्राउंड लेव्हल वर रस्त्यावर उतरून गुन्हेगारांवर कारवाई केली जाणार असून नाशिक शहर लवकरच भयमुक्त होतील यासाठी योग्य ती पावले उचलली जाणार आहेत.

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात सुरू करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान चार उपायुक्त, सात सहाय्यक पोलीस आयुक्त, 30 पोलीस निरीक्षक, 125 पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच 1150 अमलदारांचा या संपूर्ण कारवाईत सहभाग असणार आहे. कारवाईत पकडण्यात आलेल्या सराईत गुन्हेगार, टवाळखोरांवर तसेच मद्यपींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version