आज पासून नाशिक शहरात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ…
आज पासून नाशिक शहरात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ नाशिक रोड विभागीय कार्यालय येथे नाशिक महानगरपालिका उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, विभागीय अधिकारी सुनिता कुमावत, केंद्रीय संचार ब्युरो माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार सदाशिव मलखेडकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. विकसित भारत यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी महिलांचा मोठा सहभाग होता, शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नाव नोंदणी केली, आज नाशिक शहरात पहिल्या दिवशी विकसित भारतीय यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष करून महिलावर्गांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग घेऊन केंद्र सरकारच्या विविध शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली. या संकल्प यात्रेच्या ठिकाणी महिलांची आरोग्य तपासणी रक्त तपासणीची विशेष मोहीम नाशिक महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.