शिंदे गाव ड्रग्स प्रकरणी पोलिस अँक्शन मोडवर…….
नाशिक रोड पोलिस ठाण्यात उद्योजकांची बैठक…….
नाशिक रोड पोलिस ठाण्यात सहायक पोलिस आयुक्त आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गावातील उद्योजक, निमा चे प्रतिनिधी, ग्राम पंचायत प्रशासन यांची नाशिक रोड पोलिस ठाण्यात दारणा सभगृहात समन्वय बैठक घेण्यात आली. शिंदे गावात साकीनाका पोलिसांनी मोठी कारवाई करून ड्रग्स बनविणारा कारखाना उद्ध्वस्त केला. कोट्यवधींचे एम डी ड्रग्स या कारवाईत जप्त करण्यात आले. शिंदे गावातील बहुतेक कारखाने हे भाडे तत्वावर देण्यात आलेले आहेत.
या कारखान्यांमध्ये काय तयार होतो याची मुळ मालकाला कल्पना नसते. नुकतेच साकीनाका पोलिसांच्या कारवाईनंतर मालकाने संशय व्यक्त केल्यानंतर तसाच प्रकारच्या कारखान्यावर नाशिक रोड पोलिसांनी धाड टाकून मोठ्या प्रमाणात ड्रग्स बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केला. गावात सुरू असलेल्या इतर कारखाने कुणाला भाडे तत्वावर दिले आहे त्याचे योग्य प्रकारे कागदपत्रे, पोलिस पडताळणी करण्यात आली आहे की नाही तसेच यापुढे देण्यात येणारी जागा योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करूनच द्यावी अशी इतर माहिती साठी नाशिक रोड पोलिस ठाण्यात शिदे गावातील उद्योजकांची बैठक घेण्यात आली.
यावेळी उद्योजकांनी आपल्या समस्या आणि सूचना मांडल्या. सहायक पोलिस आयुक्त आनंदा वाघ यांनी उद्योजकांच्या समास्या जाणून घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस निरीक्षक पवन चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक विलास शेळके, शिंदे गावातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.