विविध मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर “ऑफ्रोह” चे धरणे आंदोलन………पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा……
नोकरी भरती कंत्राटीकरणाचे धोरण रद्द तसेच महाराष्ट्रातील मूळ आदिवासीमधील परप्रांतीयांची घुसखोरी थांबावी, राज्यात आरक्षणाची लढाई सुरु असतांना थेट आरक्षणालाच कात्री लावणेसाठी सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्हणून राज्य सरकारने थेट शासकीय नोकर भरतीचे कंत्राटीकरण करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शिक्षीत मुले, आदिवासी, दलीत मुले यांचा रोजगार हिरावून घेतले जाणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील मुळ आदिवासींमध्ये परप्रांतीय व धर्मांतरण केलेल्या जमातींनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केलेली आहे. ती थांबवावी या मागणीसाठी महात्मा गांधी जयंती दिनी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयावर आफ्रोह या संस्थेतर्फे आंदोलन करण्यात आले.
जणगणना २०११ नुसार क्षेत्रबंधनातील (TSP) ३९ % लोकसंख्या असून विस्तारीत क्षेत्रातील ( OTSP ) ६१ % अनुसूचीत जमातीची लोकसंख्या आहे. अशी एकूण १ कोटी ५ लाख अनु. जमातीची लोकसंख्या आहे. अशा एकूण ४५ अनु. जमातींपैकी स्वतःला खरे समजणारे अनु. क्षेत्रातील बारा जमातींनी सत्तेच्या जीवावर ४० वर्षे गैरफायदा घेतला आहे. भ्रष्ट व षड्यंत्रकारी अनुसूचीत जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समितीच्या माध्यमातून ६१ लाख आदिवासींचे अस्सल जात प्रमाणपत्र षड्यंत्राने, लबाडीने, फसवणूकीने “अवैध” करुन अशा जमातींना कधी नामसदृश्यत्वाचा तर कधी “जातचोर”/ “बोगस” असल्याचा आरोप करुन अन्याय केला आहे. जर विस्तारीत क्षेत्रातील ६१ लाख अनुसूचित जमाती बोगस असतील तर या लोकसंख्येच्या आधारे निवडून आलेले अनुसूचीत क्षेत्रातील १४ आमदार, २ खासदार बोगस ठरतात त्यांना पदावरुन हाटवा. या मागणीसह
विविध मागण्यांसाठी राज्यातील सहाही विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गांधीजयंती २ ऑक्टोबर २०२३ दिवशी ऑफ्रोह महाराष्ट्रच्या वतीने धरणे आंदोलने करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मोठ्या संख्येने धरणे आंदोलने करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व ऑर्गनायझेशन फॉर राईटस् ऑफ ह्यूमन (महाराष्ट्र) या संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, राज्य उपाध्यक्षा भारती धुमाळ, मार्गदर्शक सुधाकर सुसलादी, राज्य सहसचिव (महिला) वनिता नंदनवार, पुणे विभागीय अध्यक्ष अभय जगताप, पुणे विभागीय सचिव संजयकुमार कोळी आदींनी आंदोलन केले.
१) सरकारी कार्यालयातील नोकर भरतीचे कंत्राटीकरण रद्द करा. २) महाराष्ट्रातील मूल आदिवासींमध्ये परप्रांतीय व धर्मांतरण केलेल्या जातींची घुसखोरी थांबवा. ३) राज्यात ४५ पैकी १० ते १२ जमातींना आरक्षणाचे घुसखोरी करुन फायदे घेतले त्याची उच्चस्तरीय चौकशी करा. ४) वर्षानुवर्षे अनु. जमातीचे राखीव मतदार संघ तेच ते असलेने OTSP ( विस्तारीत क्षेत्रातील) च्या लोकसंख्येच्या प्रमाणात रोटेशन पध्दतीने आरक्षण ठेवा. ५) मा. सर्वोच्च न्यायालयाचे जगदीश बहिरा विरूध्द FCI आदेश दि. ६ जुलै २०१७ पूर्वी विविध शासन आदेशान्वये सेवासंरक्षित केलेल्या कर्मचाऱ्यांच्या अनुसूचित जमातीची पदे रिक्त केल्यामुळे त्यांना अधिसंख्य पदावरून वगळून नियमित पदावर ठेवा ६) शा. नि. १४ डिसेंबर २०२२ सामान्य प्रशासन विभाग यांच्यात स्पष्टता नसलेने शुध्दीपत्रक काढा. ७) सरकारी नोकरीसाठी अर्ज करतांना भरावी लागणारी फी कमी करा. ८) अनुसूचित क्षेत्रातील (TSP) अनु. जमातीप्रमाणेच OTSP तील आदिवासींना जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने द्यावे. ९) TSP आदिवासींच्या सर्व योजना OTSP तील आदिवासींना लागू करा. १०) जर न्याय मिळत नसेल तर विस्तारीत क्षेत्रातील ३३ अनु. जमातींच्या लोकसंख्येच्या आधारावर निवडून आलेल्या १४ बोगस आदीवासी आमदार व २ बोगस आदिवासी खासदार यांना हटवा. ११) माजी न्यायमुर्ती गायकवाड समितीच्या अहवालानुसार आदिवासी विकास विभागात ६५०० कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाका. १२) आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्ष मा. सुरेश धस यांचा आदिवासी विकास विभागात दाबून ठेवलेला अहवाल तात्काळ उघड करा. १३) अनु. जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समितीने “प्रधान” यांना ‘परधान’ जमातीचे, “आंध” यांना ‘अंध’ जमातीचे, “बुरुड” यांना ‘गोंड’ जमातीचे दिलेले बोगस वैधता प्रमाणपत्र रद्द क व या तपासणी समितीची व अधिकाऱ्यांची कसून चौकशी करा. १४) शा.नि. २१ डिसेंबर २०१९ मधील ४.२ ची अंमलबजावणी करा.
आज दिनांक 2.10.23 रोजी विभागीय कार्यालय नाशिक येथे आफ्रोह संघटनेतर्फे वरील सर्व प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलन केले आहे. प्रथम महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात केली. त्याप्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते आफ्रोह संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंदजी सहारकर, नाशिक जिल्हा अध्यक्ष सुधीरजी गटलेवार, उपाध्यक्ष विनोद ढोरे, लीलाधर ठाकूर, अनिल पराते, प्रशांत कोळी, प्यारेलाल नागपुरे, नारायण मोहुरे, प्रमोद करणेवार, अनिल मोरे, मीनाक्षी खडगे, प्रकाश सूर्यवंशी, चेतन ठाकूर, लीलाधर शेंद्रे, युवराज ईर्शी, सुरेश नवसारे सुधीर गटलेवर आदी उपस्थित होते. पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे यांनी सहभागी होऊन PRP च्या वतीने पाठिंबा दिला यावेळी किसन सोनवणे, संजय शिंदे, युवराज सौदाने, गणेश राजकोर, नितीन जाधव, सुरेश नवसारे उपस्थित होते.