Home अपघात नाशिक रोडला विसर्जन मिरवणूक तीन जणांचा मृत्यू……. सोळा तासानंतर वाहून गेलेल्या इसमाचा...

नाशिक रोडला विसर्जन मिरवणूक तीन जणांचा मृत्यू……. सोळा तासानंतर वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला….. ढिसाळ नियोजनामुळे घटना घडल्याची नागरिकांमध्ये चर्चा…….

0

नाशिक रोडला विसर्जन मिरवणूक तीन जणांचा मृत्यू……. सोळा तासानंतर वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला….. ढिसाळ नियोजनामुळे घटना घडल्याची नागरिकांमध्ये चर्चा…….

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी नाशिक रोड परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जण बुडून पावल्याची दुःखद घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान गुरुवारी सायंकाळी पाच वाजेला वडनेर येथील वालदेवी नदी पात्रात बुडालेल्या हेमंत कैलास सातपुते या इसमाचा मृतदेह तब्बल १६ तासानंतर आज सकाळी नऊ वाजता सापडला. हेमंत कैलास सातपुते हा गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान वडनेर दुमाला येथील वालदेवी नदीपात्रामध्ये गणपती विसर्जन दरम्यान पाण्यात बुडाला होता त्यानंतर त्याला वाचण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु पाणी जास्त असल्याने त्याचा शोध लागला नाही त्यातच अंधार झाल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते परिणामी आज सकाळी नऊ वाजता स्थानिक नागरी तसेच माजी नगरसेवक केशव पोरजे जगदीश पवार अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता सदरचा मृतदेह मिळून आला.
तर दुसऱ्या एका घटनेत चेहडी येथील संगमेश्वर नदीपात्रात सिन्नर फाटा परिसरात राहणारे प्रसाद सुनील दराडे 18 व त्याचा मित्र रोहित वैद्यनाथ नागरगोजे वय 22 हे दोघे जण चेहडी संगमेश्वर येथील नदीपात्रात श्री गणपती मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेले असता प्रसाद दराडे याला पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे पाय घसरून तो पाण्यात पडला व डुबू लागला त्याला वाचविण्यासाठी रोहित नागरगोजे यांनी पाण्यात उडी मारली परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही जण पाण्यात बुडाले व वाहून गेले. त्यानंतर या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी दोघांना बाहेर काढले व तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. प्रसाद हा बिटको महाविद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिकत आहे तर रोहित हा सामनगाव येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. गणपती विसर्जनाला घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे नाशिकरोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने शहरात गोदावरी वालदेवी नदीपात्रात पाण्याचे प्रमाण वाढले होते. गणपती विसर्जनाला दरवर्षी नदीपात्रात नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये याकरिता बांबू लावण्यात येत असतात पण यावर्षी महानगर पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक ठिकाणी बांबू लावण्यात आले नव्हते आणि नागरिक बिनधास्तपणे गणपती विसर्जन करण्यासाठी नदीपात्रात जात असल्याने दुर्दैवी घटना घडल्याचे नागरिकांमध्ये कुजबुज होती.

दरम्यान या दोन्ही घटने प्रकरणी नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version