तांत्रिक कौशल्याचा योग्य वापर करून अपहरण बालिकेचा शोध पंचवटी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी……
पंचवटी पोलीस ठाणे तपास पथकाने तांत्रिक कौशल्याचा योग्य वापर करून अपहरण बालिकेचा शोध लावला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर रोजी भादवि कलम ३६३ प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास गुन्हे शोध पथक तपास करीत असताना गुन्हयाचे तपासादरम्यान सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार व कैलास वाकचौरे यांनी प्राप्त मोबाईल क्रमांकांची तांत्रिक माहिती प्राप्त करून सुक्ष्म तांत्रिक विश्लेषण केले व त्याआधारे वेळोवेळी संबंधीत पोलीस ठाणे शाखा यांचेशी संपर्क साधुन सदर अहपूत बालिकेच्या तत्कालीन ठिकाणांचा वेळोवेळी पाठ पुरावा करून तिला कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातुन सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर योग्य कायदेशिर प्रक्रियेद्वारे पंचवटी पोलीस स्टेशन येथे आणून मुलीला पालकांचे ताब्यात सुखरूप देण्यात आलेले आहे. सदर गुन्हयाची उकल तांत्रिक व मानवी कौशल्याच्या आधारे करण्यात आलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार हे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक सपकाळे, पोलिस निरीक्षक बगाडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार, वाकचौरे, वैभव परदेशी आदींनी संयुक्तिक रित्या कामगिरी केलेली आहे.