Home क्राईम उपनगर पोलिस ठाणे हद्दीत पुन्हा गाड्यांची तोडफोड

उपनगर पोलिस ठाणे हद्दीत पुन्हा गाड्यांची तोडफोड

0

उपनगर पोलिस ठाणे हद्दीत पुन्हा गाड्यांची तोडफोड……

उपनगर पोलिस ठाणे हद्दीत पुन्हा अज्ञात समाजकंटकांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. महिन्याभरापूर्वी सुद्धा अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. उपनगर पोलिसांनी कारवाई करीत काही जणांना अटक केली होती. आता पुन्हा देवळाली गाव, गांधी पुतळा येथे किशोर सिसोदे फेटे वाले यांची MH 15 CM 5626 टाटा नॅनो, योगेश्वर नगर, विहितगाव, वडनेर रोड येथील विशाल लक्ष्मण बोरसे यांची MH 04 CZ 10 व्यागेणार, शिवकमल सर्विसेस सेंटर राजेंद्र शिवराम बोराडे यांची MH 15 HG 1612, भैरवनाथ मंदिर, वडनेर रोड संजय पोरजे MH 04 FZ 6762, वडनेर रोड येथील मच्छिंद्र कोठुळे यांची छोटा हत्ती वाहनाची काच फोडली तर रुंदावन कोलेनी यांच्या MH 03 Z 1869, गाडीचे तसेच वृंदावन कॉलनी येथील मारुती व्हॅन गाडीच्या काचा फोडून अज्ञात समाज कंटकांनी नुकसान केले.

पोलिस आयुक्तांनी यासर्व प्रकाराकडे लक्ष द्यावे कारण गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले असून त्यांना वेळीच अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. तोडफोड प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version