नाशिकरोडला युवकाचा बेवारस मृतदेह मिळाल्याने खळबळ…….
नाशिकरोड उपनगर हद्दीत टकळी रोडवर असलेल्या महानगर पालिकेच्या मलनिःसारण केंद्रा जवळ एका ३० वर्षीय युवकाचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शव विच्छेदन साठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. युवकाचा मृतदेह गेल्या आठ दिवसांपासून तिथे होता असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख करने कठीण होत आहे. आठ दिवसांपूर्वी नाशिकरोड पोलिस ठाण्यात पंचक येथील एक युवक हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
मृतदेह त्याच व्यक्तीचा असावा म्हणून त्यांच्या घरच्यांना बोलवण्यात आले पण मृतदेह कुजलेले असल्याने मृतदेहाची ओळख झाली नाही. मृतदेह मिळाल्याची माहिती पसरताच युवकाचा खून की आत्महत्या याबाबत तर्क वितर्क सुरू होते. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून खून की आत्महत्या याचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.