Home क्राईम प्रतिबंधित अंमलीपदार्थ एम. डी. (मॅफेड्रॉन) विक्री करणाऱ्या इसम ताब्यात….. नाशिकरोड पोलीस ठाणे...

प्रतिबंधित अंमलीपदार्थ एम. डी. (मॅफेड्रॉन) विक्री करणाऱ्या इसम ताब्यात….. नाशिकरोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी…….

0

प्रतिबंधित अंमलीपदार्थ एम. डी. (मॅफेड्रॉन) विक्री करणाऱ्या इसम ताब्यात…..
नाशिकरोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी…….

अलीकडच्या काळात अंमली पदार्थांचे व्यसन हे सर्व देशांसाठी भयंकर समस्येचे कारण बनले आहे. तरुण पिढी मद्यधुंद होताना दिसत आहे. हे कोणत्याही देशासाठी चांगले लक्षण नाही.
नाशिक शहरात युवा पिढीला घटक अमली पदार्थाच्या आहारी लावण्याचा धंदा करणाऱ्या इसमास नाशिक रोड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.नाशिकरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदा वांजळे यांच्या मार्गदर्शनाखी गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत फड आणि सुभाष घेगडमाल यांना गुप्त बातमी मिळाली कि, गणेश संजय शर्मा वय २० वर्षे रा- म्हाडा बिल्डींग नं ३, रूम नं. ०५ अश्विनी कॉलनी, सामानगांव रोड, पॉलिटेकनीकल कॉलेजजवळ नाशिकरोड हा अंमली पदार्थ विकण्यास येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने ७ सप्टेंबर रोजी १५:४५ वाजता म्हाडा बिल्डींगचे गेट समोर अश्विनी कॉलनी कडे जाणारे रस्त्याचे कडेला, सामानगाव रोड जवळ, नाशिक रोड येथे गणेश संजय शर्मा वय २० वर्षे रा- म्हाडा बिल्डींग नं ३, रूम नं. ०५ अश्विनी कॉलनी, सामानगांव रोड. याने विक्रीकरीता १२.५ ग्रॅम एम डी म्हणेच मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ बेकारयदेशिर रित्या स्वतःचे कब्जात बाळगळतांना अढळुन आल्याने त्यास सापळा रचुन कारवाई करण्यात आलेली आहे.

नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध अंमली औषधीद्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस ॲक्ट) चे कलम ८ (क), २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई दरम्यान संशयिताच्या अंगझडतीत ५००००/- रुपये किमतीचा १२.५ ग्रॅम एम डी म्हणेच मॅफेड्रॉन, २००००/- रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, रोख रक्कम १,७००/- असा एकुन ७१,७००/- हस्तगत करण्यात आलेला आहेत. सदर आरोपीकडुन तपासादरम्यान नाशिक शहरातील अवैधरित्या अमलीपदार्थ विक्री करणारे रेकॉर्डवरील आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,  पोलीस उप आयुक्त मोनिका राउत, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत फड, सुभाष घेगडमल, कोळी, पोतन,  पानसरे, कासार, जाधव,  नागरे,  गाडेकर, शिंदे यांनी कामगिरी केलेली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version