म्हसरुळ-धात्रक गॅंग’’ मधील
गुन्हेगारांच्या टोळीला मोक्का…….
आतापर्यंत पाच तोळींवर मोक्का..,..
शहरात सुरू असलेल्या संघटित गुन्हे करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करीत आतापर्यंत पाच टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात दाखल भादवि कलम 307,34 सह शस्त्र अधिनियम 4/25 सह क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट कलम 7, व मपोकाक 135 प्रमाणे दाखल गुन्हयात निष्पन्न 4 आरोपींविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 मोक्का या कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 6 ऑगस्ट रोजी म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीत गुन्हयातील आरोपिंनी संगनमत करून फिर्यादी व त्यांचा मित्र यांना लाथाबुक्यांनी व शस्त्राने जिवे ठार मारण्याचे उददेश्याने जखमी केले होते. तपासात गुन्हयातील मुख्य आरोपी व गुन्हेगारी टोळीचा सुत्रधार गणेश बाबुराव धात्रक हा गुंड प्रवृत्तीचा असुन त्याने त्याचे साथीदार दर्शन गोरख गायकवाड, अभिशेक अनिल गिरी, आकाश पांडुरंग चारोस्कर व त्यांचे इतर साथीदारांनी मिळुन गुन्हेगारी टोळी निर्माण केली असुन संघटीत रित्या घातक हत्यारे जवळ ठेवून नाशिक शहरातील म्हसरुळ, पंचवटी, उपनगर, भद्रकाली, व नाशिक तालुका इ.पोलीस ठाणे हददीत अवैधरित्या शस्त्र बाळगुन नागरिकांना धमकावुन मारहाण करणे, खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, अपहरण करणे, दंगा करणे, घातक शस्त्रानिशी दंगा करणे, या प्रकारे परिसरात अनेक गुन्हे करुन टोळीची दहशत निर्माण केली आहे.
टोळी प्रमुख मुख्य आरोपी गणेश बाबुराव धात्रक याने गुन्हा करतांना टोळीतील सदस्यांच्या सहाय्याने हिंसाचाराचा, अवैध शस्त्रांचा वापर करून धाकदपटशा दाखवुन परिसरात वर्चस्व निर्माण करून स्वतःची व टोळीची दहशत कायम ठेवण्यासाठी बेकायदेशीर कृत्य चालु ठेवलेले होते. सदर टोळीतील सदस्यांविरूध्द म्हसरुळ, पंचवटी, उपनगर, भद्रकाली, व नाशिक तालुका इ. पोलीस ठाणे अंतर्गंत १७ गुन्हे दाखल झालेले आहेत. वरील गुन्हयातील टोळीने नियोजीतबध्द कट रचुन गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झालेले असुन त्यांनी संघटीत रित्या गुन्हा केला असल्याने पोलीस आयुक्तांनी गुन्हयातील आरोपींविरूध्द कठोर कारवाई करून “महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम मोक्का कायदयाअंतर्गत ठोस कारवाई केली आहे.
आरोपींमुळे नाशिक शहरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करुन दहषत निर्माण केल्याने नाशिक शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी मोक्का कायदयान्वये पाचव्या गुन्हेगारी टोळीस जेरबंद करुन ठोस प्रतिबंधक कार्यवाही केली आहे.