पत्रकारावर दाखल गुन्हा मागे घेण्याची मागणी….. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…….. किरीट सोमय्या बद्दल वार्तांकन केले होते…….
लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक,कमलेश सुतार यांच्या विरोधातील गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पगारे, प्रदेश उपाध्यक्ष सतीश रुपवते, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हचे संपादक, विठ्ठल भाडमुखे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले.
सुतार यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल असलेला व्हिडियोच्या अनुषंगाने वार्तांकन केले मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वार्तांकन करण्याबद्दल गुन्हा दाखल होणे हा पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे असे गुन्हे दाखल होत राहिल्यास लोकशाही देशात पत्रकारांना काम करणे अवघड होईल. पुरोगामी प्रसार माध्यमं संघ या घटनेचा निषेध करीत असून, सुतार यांच्यावर दाखल गुन्हा त्वरित माघे घ्यावा अशी मागणी पत्रकार संघातर्फे करण्यात आली आहे.