Home क्राईम प्रतिबंधित गुटखा निर्मीती करणारा कारखाना नाशिकरोड पोलीसांनी केलं उध्वस्त, २,१३,९२०/- रु. किमतीच्या...

प्रतिबंधित गुटखा निर्मीती करणारा कारखाना नाशिकरोड पोलीसांनी केलं उध्वस्त, २,१३,९२०/- रु. किमतीच्या मुद्देमालासह ३ इस्मांना केली अटक

0

प्रतिबंधित गुटखा निर्मीती करणारा कारखाना नाशिकरोड पोलीसांनी केलं उध्वस्त, २,१३,९२०/- रु. किमतीच्या मुद्देमालासह ३ इस्मांना केली अटक

 

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांना गोपनीय बातमी मिळाली की, नाशिकरोड पोलीस स्टेशन हद्दीतील सामनगाव शिवारात मातृछाया फार्महाउस परीसरातील जुन्या घरामध्ये काही इसम हे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ पानमसाला, गुटखा असे पदार्थ बेकायदेशीररित्या उत्पादित करुन विक्रीकरीता साठवून ठेवत आहे. सदरची बातमी मिळताच शेळके यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, यांना सांगितली वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी ख करून कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके व कर्मचारी यांना कारवाईसाठी घटना स्थळी दाखल झाले

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांनी मिळालेल्या माहितीनुसार एकलहरे औष्णिक विदयुत केंद्रालगतच्या रस्त्याने जावून सामनगाव शिवारातील मातृछाया फार्महाउसच्या समोरून सागाच्या बागेतून पुढे जावून एका जुन्या घरासमोर एका खोलीमध्ये जावून छापा टाकला असता त्या ठिकाणी १) दिनेश बाबुलाल कुमार वय ३५ वर्षे २) निलेश दिनेश इंगळे वय ३३ वर्षे ३) दिपक मधुकर चव्हाण वय ४५ वर्षे यांनी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध केलेल्या अन्नपदार्थ अवैधरित्या उत्पादित व पॅकींग करताना तसेच कब्जात बाळगताना मिळून आले त्यांचे ताब्यातून २१३९२० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आरोपी नामे संजय रुद्रनारायण मिश्रा वय ४० वर्षे रा. भिवंडी ठाणे हा देखील या व्यवसायात भागीदार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पान मसाला, सुगंधित तंबाखू व गुटखा निर्मीतीची साहित्य साधने, मशीन्स कच्चा माल व तयार मालासह एकुण २,१३,९२०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तरी दिनांक ०२/०९/२०२३ रोजी नाशिकरोड पोलीस स्टेशन हद्दीत सामनगावं गावाचे शिवारात मातृछाया फार्महाउस परीसरातील जुन्या घरामध्ये आरोपी नामे १) दिनेश बाबुलाल कुमार वय ३५ वर्षे मुळ रा. नुही बारादेवी, नेहरीया नगेश्वरी मंदीराच्या मागे मलीन वस्ती ता. जि. कानपुर राज्य उत्तरप्रदेश सध्या रा. आरिंगळे मळा, सिन्नर फाटा नाशिकरोड, २) निलेश दिनेश इंगळे वय ३३ वर्षे रा. त्रिमुर्ती चौक शिंदे सायकलच्या मागे वरद गणपती मंदीरासमोर पाटील नगर अंबड नाशिक ३) दिपक मधुकर चव्हाण वय ४५ वर्षे रा. सिध्दीविनायक से हाउस, मोरेमळा, अंबड बुरकुले हॉलच्या पाठीमागे उत्तमनगर नाशिक यांनी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध केलेल्या अन्नपदार्थ अवैधरित्या उत्पादित व पॅकींग करताना तसेच कब्जात बाळगताना मिळून आले तसेच सदर अन्न पदार्थोंमध्ये नशाकारक व अपथ्यकारक औषधीद्रव्य असल्याने ते सेवन करणा-यांना क्षती अथवा दुखापत पोहोचेल याची जाणीव असताना देखील सदर अन्नपदार्थ कब्जात बाळगला तसेच सदर ठिकाणी छाप्यादरम्यान एकुण २,१३,९२० /- रूपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपींचे विरोधात भादंवि कलम ३२८, १८८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ०३ आरोपींना अटक करण्यात आले आहे. गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके हे करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version