दामिनी पथकातर्फे शाळा कॉलेज मध्ये प्रबोधन…….मुलींना आणि महिलांना मार्गदर्शन…….
नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी टवाळखोर यांच्यावर अंकुश बसावे तसेच गल्ली बोळात, शाळा कॉलेज आणि गर्दीच्या ठिकाणी मुलींना महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे इशारे करने, अश्लील भाषा बोलणे असे अनेक प्रकारे वर्तन करून छेड करणारे टवाळखोर यांच्यावर थेट कारवाई करण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना केली आहे.
दामिनी पथकात झोन १ आणि २ मध्ये एकूण 42 दामिनी थेट मुलींना आणि महिलांना टवाळखोर यांचा त्रास होणार नाही यावर लक्ष ठेवणार आहेत तसेच विभागात येणाऱ्या शाळा कॉलेज आदी ठिकाणी जाऊन मुलींना, विद्यार्थिनींना आणि महिलांना मार्गदर्शन करून प्रोबधन करण्याचे काम करीत आहे. टवाळखोर यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास घाबरून न जाता थेट दामिनी पथकाला किंवा ११२ या क्रमांकावर तक्रार करावी आदी सूचना देण्यात आल्या.
दामिनी पथक यांचा थेट संवाद आणि संपर्क होत असल्याने नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. शनिवारी लेमरोड येथील मराठा विद्या प्रसारक समाज श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात दामिनी पथकाने भेट देऊन विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यानंतर कॉलेज परिसरात इतर ठिकाणी फिरून मुलींना आणि मुलांना दामिनी पथकाची माहिती दिली. कॉलेज बाहेर परिसरात फर्स्ट असलेले टवाळखोर यांना समज देण्यात आली.
कॉम्प्लेक्स मध्ये लपून बसलेले टवाळखोर दामिनी पथकाला पाहून पळ काढला. यावेळी दामिनी पथकाच्या शिल्पा मोरे, सुजाता वाळूंज, अनिया रहाणे, सोनाली माळी यांनी काही टवाळखोरांना दामिनी पथकाचा प्रसाद दिला. फक्त प्रसाद न देता अनेक युवकांना माहिती यावेळी देण्यात आली. दामिनी पथक सारखेच सिंघम पथक पोलिस आयुक्तांनी निर्माण करावा ज्याने फिल्डवर नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क निर्माण होईल आणि पोलिस नागरिक यांच्यात मोठ्या प्रमाणत मैत्री निर्माण होऊन गुन्हेगारांवर अंकुश बसेल यासाठी लवकरात लवकर यासाठी विशेष पथक निर्माण करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.