गुंडा विरोधी पथकाची टवाळखोरांवर धडक कारवाई…….
शहरात वर्दळीच्या अनेक ठिकाणी टवाळखोर त्रास देत असल्याने गुंडा विरोधी पथकाचे अधिकाऱ्यांनी टीम सह उपनगर पोलीस ठाणे व नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत पायी गस्त करून टवाळखोर गुन्हेगारांवर धडक कारवाई केली. टवालखोरांना लाठीचा समाचार देताच सर्व परिसरामधील टवाळखोर आणि गुन्हेगार हे गायब झाल्याने यामुळे काही काळ काही चौक मोकळे झाले होते. मागील पंधरा दिवसापासून अंबड परिसरात झालेल्या गुन्हेगारीच्या अनुषंगाने अंबड परिसरात गुंडा पथकाची धडक मोहीम राबवून गुन्हेगारांना कठोर कारवाई करून गुन्हेगारी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न झाला त्याच धर्तीवर आज उपनगर पोलीस ठाणे व नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील मोकळ्या मैदानी, गुन्हेगार बसणारे चौकामध्ये पायी गस्त करून लाठीचा मार देऊन त्यांची धरपकड केली यामुळे आज उपनगर चे परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले.
अशाच प्रकारे पोलिस फिल्डवर असेल तर गुन्हेगारांवर धाक बसणार आहे. कायमस्वरूपी गस्त करण्याची अपेक्षाही सामान्य जनता करत आहे यामुळे नक्कीच गुन्हेगारीवर अंकुश बसू शकते. सदरची कारवाई बाबत गुंडा विरोधी पथक प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की माननीय पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पूर्ण शहरातील पोलीस ठाण्याचे टोळीची माहिती तसेच मोकळी मैदानी टावाळखोर बसणारी ठिकाणी गुन्हेगाराचे अड्डे यांची माहिती काढून मागील पंधरा दिवसापासून लाठ्या चा मार देऊन आता गुन्हेगाराना चोप देऊन शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करून शांतता निर्माण करण्याचा जणू काही गुंडा विरोधी पथकाने विडाच उचलला आहे या कारवाईचे सर्व स्तरातून जोरदार कौतुक होत आहे अशाच प्रकारे कायम गस्त करणे बाबत जनता अग्रह धरत आहे
सदरची कारवाई गुंडा पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, गुंजाळ, डि के पवार, अंबादास बकाल, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, मिलिंद जगताप, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, सावकार, संदीप आंबरे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे