Home ताज्या बातम्या देवळा तालुक्यातील पूर्व भागातील परसुल धरणातील पाणीसाठा… अत्यल्प झाल्यामुळे दहा गावांच्यापाणी...

देवळा तालुक्यातील पूर्व भागातील परसुल धरणातील पाणीसाठा… अत्यल्प झाल्यामुळे दहा गावांच्यापाणी योजना बंद पडणार

0

देवळा तालुक्यातील पूर्व भागातील परसुल धरणातील पाणीसाठा… अत्यल्प झाल्यामुळे दहा गावांच्यापाणी योजना बंद पडणार..

 

दहिवड परिसरात परसुल हे धरण 1885 यावर्षी बांधण्यात आलेले आहे या ठिकाणाहून दहिवड 2 रामनगर, 1 उमराणे, 2 महात्मा फुले नगर, तिसगाव, सांगवी, कुंभार्डे मेशी, आधी गावांच्या लाखो रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना विहिरी करण्यात आलेले आहे परंतु आज त्या विहिरींना पाणी नसल्यामुळे गावांनी एक एक दोन दोन दिवसात पाणीपुरवठा सुरू केलेला आहे त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहे यासाठी शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन पोलीस बंदोबस्तात का होईना चनकापूर उजव्या कालव्याचे पाणी परसुल धरणापर्यंत पोहोच केले पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल व जनावरांसाठी छावण्या उभारण्यात याव्या अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे.

देवळा प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version